Vistara Cancellations : विस्ताराने आपली १० टक्के उड्डाणं केली रद्द

Vistara Cancellations : विस्तारा विमान कंपनीने उपलब्ध कर्मचारी वर्ग बघता हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

220
Vistara Cancellations : विस्ताराने आपली १० टक्के उड्डाणं केली रद्द
  • ऋजुता लुकतुके

एप्रिल महिन्यापासून विस्तारा कंपनीच्या विमान उड्डाणांमधील अनियमिततेमुळे प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. आता सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन कंपनीने एप्रिल महिन्यात १० टक्के उड्डाणं कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्ण क्षमतेनं काम करत असेल तर कंपनी एका दिवसांत ३५० विमान उड्डाणं करते. पण, आता हे प्रमाण किमान ३५ उड्डाणांनी कमी होणार आहे. त्यामुळे कार्यरत असलेल्या पायलटना चांगली विश्रांती मिळू शकेल. (Vistara Cancellations)

१ एप्रिलपासून कंपनीचे काही पायलट आणि इतर कर्मचारी वर्ग संपावर आहेत. त्यामुळे पहिल्या ८ दिवसांत कंपनीला जवळ जवळ १५० उड्डाणं रद्द करावी लागली आहेत. काही पायलटनी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अचानक आजारपणाची सुटी घ्यायला सुरुवात केली. त्यांचा उड्डाणाचं वेळापत्रक तसंच पगारवाढीला विरोध आहे. त्यामुळे सध्या हा नाराज कर्मचारी वर्ग सुटीवर गेला आहे. (Vistara Cancellations)

(हेही वाचा – Devendra Fadnavis : शक्तीला कोणी थांबवू शकत नाही; देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना इशारा)

रद्द झालेली उड्डाणं ही देशांतर्गत मार्गावरील

त्याचा फटका कंपनीच्या उड्डाणांना बसतो आहे. त्यामुळे रविवारी कंपनीने स्वत: पुढे येत विमानं रद्द करण्याचं धोरण लोकांसमोर आणलं आहे. ‘फेब्रुवारी २०२४ मध्ये आम्ही ज्या क्षमतेनं उड्डाण करत होतो, त्याच क्षमतेवर आम्ही परतणार आहोत. म्हणजे दिवसाला ३२० ते ३२५ उड्डाणं आम्ही करणार आहोत. आणि जी उड्डाणं रद्द होतील त्याची माहिती प्रवाशांना वेळेवर दिली जाईल,’ असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Vistara Cancellations)

रद्द झालेली उड्डाणं ही देशांतर्गत मार्गावरील आहेत. आणि आंतरराष्ट्रीय मार्ग नियमित सुरू ठेवण्याचाच कंपनीचा विचार आहे. विस्तारा कंपनी टाटा सन्समध्ये विलिन होणार आहे. आणि सध्या विलिनीकरणाच्या वाटाघाटीच सुरू आहेत. अशावेळी एअर इंडिया आणि विस्तारा कंपनीच्या कर्मचारी वर्गाला पगार आणि कामाच्या नियमांच्या बाबतीत एका प्रतलावर आणणं आणि नवीन धोरणं ठरवणं यावर सध्या काम सुरू आहे. आणि अशातच विस्तारा कंपनीने वैमानिक आणि इतर कर्मचारी वर्गाला दिलेली पगारवाढ त्यांना रुचलेली नाही. त्यामुळे कंपनीत अंतर्गत अस्वस्थता आहे. (Vistara Cancellations)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.