Devendra Fadnavis : सुनेत्रा पवारांना दिलेले मत मोदींना जाईल, तर सुप्रिया सुळेंना दिलेले मत राहुल गांधींना जाईल; फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार

173
बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या दोन उमेदवारांमध्ये लोकसभेची निवडणूक होणार असली तरी प्रत्यक्षात ती लढत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातच आहे कारण सुनेत्रा पवारांना दिलेले मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जाईल त्या लोकसभेत मोदींच्या बाजूनेच उभ्या राहतील त्या उलट सुप्रिया सुळे निवडून आल्या तर त्या लोकसभेत राहुल गांधींच्या बाजूने उभ्या राहतील हेच मी म्हणालो होतो आणि आजही तेच म्हणतो पण कुणाला समजूनच घ्यायचे नसेल तर त्याला काही करू शकत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शरद पवारांना हाणला.
बारामतीतली लढाई मोदीविरुद्ध राहुल अशी करण्यात फडणवीस (Devendra Fadnavis) यांची चतुराई दिसली. संपूर्ण देशभरात भाजपा ही लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्यातच आहे, असे नॅरेटिव्ह तयार करत आहे. ‘इंडि’ आघाडीने पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला नसला, तरी राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रा संपूर्ण भारतात फिरून स्वतःभोवतीच केंद्रित केली होती. त्यामुळे आपोआपच काँग्रेसकडून त्यांचेच नाव पुढे येईल, अशी राजकीय व्यवस्था काँग्रेसने केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने 2024 ची लढाई मोदी विरुद्ध राहुल अशीच समोर आणली आहे. त्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणून बारामतीसारख्या हायप्रोफाईल मतदारसंघात फडणवीस यांनी केवळ पवार कुटुंबातील लढाई न ठेवता ती मोदी विरुद्ध राहुल अशी करून शरद पवारांची कुचंबणा केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.