काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष एकदा म्हणाले होते, मोदी देशात जिथे कुठे जातात, तिथे काश्मीरबाबत का बोलतात ? हा फाळणीचा विचार नाही का ? लोकमान्य टिळक म्हणाले होते का की जालियनवाला बाग हत्याकांड आणि माझा काय संबंध ? काश्मीरमध्ये जेव्हा काश्मिरी पंडितांची घरं जाळण्यात आली, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) काँग्रेसच्या विरोधात उभे रहात भूमिका घेतली होती. त्या वेळी बाळासाहेब ठाकरे असं नाही म्हणाले की काश्मीरमध्ये आग लागली आहे, तर महाराष्ट्रातल्या लोकांचा काय संबंध? मला आनंद आहे की, एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जात आहे, असे उद्गार काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराची सभा घेतली. या वेळी त्यांनी विरोधकांवर घणाघात केला. (PM Modi Chandrapur)
काँग्रेस बरोबर आहे, ती नकली शिवसेना
पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी म्हणाले की, “आपल्या कर्मांमुळे काँग्रेस पक्षाने पाठिंबा गमावला आहे. काँग्रेस आता ‘फोडा आणि राज्य करा’ हे धोरण अवलंबलं आहे. काँग्रेसच्या (Congress) जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची भाषा आहे. हे देश स्वीकारणार आहे का ? यांचे खासदार भारताच्या फाळणीची भाषा करत आहेत. इंडि आघाडीचे लोक दक्षिण भारत वेगळा करु म्हणत आहेत. द्रमुकचे लोक सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया म्हणत आहेत. अशा काँग्रेसच्या लोकांना नकली शिवसेनेचे लोक महाराष्ट्रात आणून रॅली करतात. काँग्रेस बरोबर आहे, ती नकली शिवसेना आहे.”
या वेळी पंतप्रधानांनी सर्वांना गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या. “उद्यापासून गुढीपाडव्याचे नवे पर्व सुरु होत आहे. सगळ्या बंधू भगिनींना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (PM Modi Chandrapur)
हेही पहा –