हिंदू पुराणात मानेसर (Manesar) नावाचा उल्लेख आहे. हा एक संस्कृत शब्द असून मानेसर म्हणजे “मस्तिष्काच्या देवाची भूमी” किंवा भगवान शिवाची भूमी… मानेसर हे भारताच्या हरियाणा राज्यातील दिल्ली एनसीआरमधील प्रसिद्ध शहर आहे. आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेल्या या शहराची गणना देशातील वेगाने विकसित होणाऱ्या औद्योगिक शहरांमध्ये केली जाते. राजधानी दिल्लीपासून जवळ असल्याने येथे रस्त्याने सहज पोहोचता येते. (Manesar)
आता उन्हाळी सुट्टी पडतेय, तर प्रत्येक जण फिरायला जाण्याची प्लानिंग करतोय. मानेसर हे ठिकाण सुट्टी घालवण्यासाठी आदर्श ठिकाण आहे. मानेसरला (Manesar) पाहण्यासारखे आणि फिरण्यासारखे अनेक ठिकाण आहेत. कॅंप मस्टॅंग, एअर सफारी, मानेसर गोल्फ कोर्स, सुल्तानपूर बर्ड सेंच्युरी, माता शीतला देवी मंदिर, दमदमा तलाव, हेरिटेज ट्रान्स्पोर्ट म्युझियम… त्यामुळे ही अद्भुत आणि सुंदर स्थळे पाहायला तुम्हाला मानेसरला यावेच लागेल. (Manesar)
(हेही वाचा – Gautam Buddha : कठोर तपश्चर्या करून दैवी ज्ञान प्राप्त करणारे गौतम बुद्ध)
मानेसरमध्ये बोलल्या जातात ‘या’ भाषा
मानेसरचा शांत परिसर आणि आल्हाददायक हवामान यामुळे हे एक सुंदर गंतव्यस्थान आहे. आधुनिक सुविधा आणि नैसर्गिक सौंदर्याच्या परिपूर्ण मीलनासह, मानेसर विविध प्रवाशांना आकर्षित करते. समृद्ध सांस्कृतिक वारसा, नयनरम्य ठिकाणे आणि चांगलेर आदरातिथ्य यामुळे ते एक संस्मरणीय प्रवासाचे ठिकाण बनते. (Manesar)
मानेसर (Manesar) हे हरियाणा राज्यातील गुडगाव जिल्ह्यात स्थित आहे. उन्हाळ्यात, येथील तापमान १८ ते ४५ डिग्री सेल्सिअस आणि हिवाळ्यात ४ ते ३३ डिग्री सेल्सियस पर्यंत असते. त्यामुळे इथे प्रवासाला निघताना तुम्हाला तशी तयारी करायला हवी. या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या अधिकृत भाषा इंग्रजी, हिंदी आणि हरियाणवी आहेत. म्हणून इथे आल्यावर कोणती भाषा बोलावी असा प्रश्न तुम्हाला पडत नाही. तुमची हिंदी बरी असली तरी तुम्ही इथल्या स्थानिक लोकांशी संवाद साधू शकता. (Manesar)
(हेही वाचा – Fatepur : अकबराच्या शाही शहराचे पहिले नाव ‘फतेहपुर’; चला जाणून घेऊयात रंजक गोष्टी)
यांचा होणार मोठ्या प्रमाणावर विस्तार
मानेसरमध्ये अनेक शैक्षणिक संस्था, हॉटेल, कार्यालये आणि कारखाने आहेत. म्हणूनच इथे येऊन उत्तम राहण्याची सोय होऊ शकते. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्प हा भारत सरकारचा राज्य प्रायोजित औद्योगिक विकास प्रकल्प आहे. हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे ज्याचा उद्देश भारतातील सहा राज्यांमध्ये पसरलेले औद्योगिक क्षेत्र विकसित करणे आहे. या प्रकल्पामध्ये या राज्यांमधील कॉरिडॉरच्या मार्गावर असलेल्या औद्योगिक क्लस्टर्स आणि रेल्वे, रस्ते, बंदर, हवाई कनेक्टिव्हिटी यासह पायाभूत सुविधा आणि उद्योगांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होणार आहे. त्यामुळे भविष्यात इथे प्रवास करणे सुकर होणार आहे. या दृष्टीनेही मानेसर महत्वाचे ठिकाण आहे. (Manesar)
मानेसर (Manesar) हे राष्ट्रीय महामार्ग ४८ वर वसलेले आहे आणि या मार्गावर स्थानिक बसेस उपलब्ध आहेत. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन गुडगाव स्टेशन आहे. हरियाणामध्ये येणाऱ्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या भागापर्यंत मेट्रो रेल्वे सेवा विस्तारित करण्यासाठी हरियाणा स्वतःचे मेट्रो कॉर्पोरेशन स्थापन करणार आहे आणि मेट्रो रेल्वेचा विस्तार मानेसर शहरापर्यंत करण्याची योजना आहे. म्हणूनच तुम्हाला मानेसरला जाण्यासाठी खास तयारीची आवश्यकता नाही. मात्र या बाबी तुम्हाला ठाऊक असायला हव्यात जेणेकरुन तुम्ही चांगली तयारी करुन मानेसरचा प्रवास करु शकाल. (Manesar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community