तळागळात रुजण्याच्या दृष्टीने भारतीय जनता (BJP) पक्ष सध्या प्रत्येक जिल्ह्यांच्या ठिकाणी भाजपाचे स्वत:च्या मालकीचे कार्यालय असावे, या हेतूने गेल्या वर्षात अनेक ठिकाणी जिल्हा मुख्यालय उभारण्यात आले आहे. याच धर्तीवर ठाण्यातही भाजपाचे नवे सुसज्ज दालन ठाणे जिल्हा मुख्यालय (BJP Office Inaugurated) उभारण्यात आले आहे. (DCM Devendra Fadanvis)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : खडसेंच्या भाजपा एन्ट्रीमध्ये ओबीसी कार्डचे गणित)
उद्घाटन निमित्त भाजपा शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन करणार
ठाणे शहरात ९ एप्रिल (Thane City 9 april) रोजी गुढीपाडव्याच्या (Gudhipadva 2024) मुहूर्तावर भारतीय जनता पक्ष विभागीय मुख्यालयाचे अनावरण करणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. या वेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (State President Chandrasekhar Bawankule) उपस्थित रहाणार आहेत. कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने भाजपा शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. (DCM Devendra Fadanvis)
(हेही वाचा – Girish Mahajan : लायकी काढणाऱ्या संजय राऊतांना गिरीश महाजनांची चपराक; म्हणाले… )
कसे आहे नवे कार्यालय ?
जिल्हास्तरीय बैठका, विविध कार्यक्रम, नेत्यांच्या पत्रकार परिषद याठिकाणी होणार असून उत्तम दालन, कॉन्फरन्स रूम, पार्किंगची व्यवस्था याठिकाणी करण्यात आली असून एखाद्या कॉर्पोरेट कार्यालयाच्या धर्तीवर या मुख्यालयाची रचना करण्यात आली आहे. भाजपचे माजी राज्यसभा खासदार, ठाणे लोकसभाप्रमुख डॉ. विनय सहस्त्रबुद्धे (Dr. Vinay Sahastrebuddhe) यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन याठिकाणी भेट देत येथील सोयीसुविधांबद्दल आढावा घेतल्याचे नमूद केले. (DCM Devendra Fadanvis)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : सातारा माढ्याच्या जागेचा तिढा सुटणार ? )
ठाण्यातील कार्यक्रम आटोपून उपमुख्यमंत्री फडणवीस बदलापूर येथे भाजप आमदार किसन कथोरे (MLA Kisan Kathore) यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला रवाना होणार आहेत. (DCM Devendra Fadanvis)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community