Gudi Padwa 2024 : हिंदूंच्या अद्वितीय कालमापन पद्धतीचे अलौकिकत्व सांगणारा गुढीपाडवा!

Gudi Padwa 2024 : जसा हिंदुंचा कुठलाही सण हा मौजमजेचा विषय नसतो, तर मांगल्य, पावित्र्य, चैतन्य यांचा आनंदसोहळा असतो, तसाच गुढीपाडवाही आहे! आणि त्यातही गुढीपाडव्याचे एक अधिक वैशिष्ट्य म्हणजे, हा सण काळाची प्रत्यक्ष जाणीव करून देतो.

207
Gudi Padwa 2024 : हिंदूंच्या अद्वितीय कालमापन पद्धतीचे अलौकिकत्व सांगणारा गुढीपाडवा!
Gudi Padwa 2024 : हिंदूंच्या अद्वितीय कालमापन पद्धतीचे अलौकिकत्व सांगणारा गुढीपाडवा!

गुढीपाडवा म्हटले की, येते… गुढीपूजन, रांगोळ्या, भरजरी पोशाख, गोडधोड, भगवे ध्वज आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नववर्षाच्या शुभेच्छा! हो, हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

जसा हिंदुंचा कुठलाही सण हा मौजमजेचा विषय नसतो, तर मांगल्य, पावित्र्य, चैतन्य यांचा आनंदसोहळा असतो, तसाच गुढीपाडवाही आहे! आणि त्यातही गुढीपाडव्याचे एक अधिक वैशिष्ट्य म्हणजे, हा सण काळाची प्रत्यक्ष जाणीव करून देऊन जिवाला अधिकाधिक अंतर्मुख करतो! अंतर्मुख झालेला जीव अधिकाधिक ईश्वराकडे ओढला जातो! (Gudi Padwa 2024)

(हेही वाचा – DCM Devendra Fadanvis : गुढीपाडव्याच्या दिवशी फडणवीस करणार ठाण्यातील भाजपाच्या कार्यालयाचे उद्घाटन)

जेव्हा नवीन वर्षाचा संबंध येतो, तेव्हा साहजिकच काळाचा संबंध येतो. गुढीपाडव्याच्या धार्मिक कृतीत अभ्यंगस्नान करताना ‘देशकालकथन’ ही कृती करावयास सांगितली आहे. हे देशकालकथन ना केवळ प्राचीन हिंदू संस्कृतीच्या (Hindu Culture) महानतेने आपल्याला अवाक करते, तर या अतीप्रचंड काळाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सूक्ष्मतम अस्तित्वाची जाणीवही करून देते!

‘ब्रह्मदेवाचा जन्म झाल्यापासून आतापर्यंत ब्रह्मदेवाची किती वर्षे झाली; कोणत्या वर्षातील कोणते आणि कितवे मन्वंतर चालू आहे; या मन्वंतरातील कितवे महायुग अन् कोणते उपयुग चालू आहे’, या सर्वांचा उल्लेख ‘देशकालकथना’त असतो.

हिंदु संस्कृतीची प्राचीनता!

२०२४ या वर्षाच्या गुढीपाडव्याला हिंदु धर्माच्या (Hindu Religion) कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लक्ष ५३ सहस्र १२६ व्या वर्षाचा आरंभ होत आहे.
टीप : १ खर्व म्हणजे १०,००,००,००,००० वर्षे (शंभर सहस्र लक्ष किंवा लक्ष लक्ष वर्षे), तर १ निखर्व म्हणजे १,००,००,००,००,००० वर्षे (दहा सहस्र कोटी वर्षे)

भारतीय कालगणनेची महती!

भारतीय कालगणनेत युग पद्धतीचा विचार केला जातो. सत्य (कृत), त्रेता, द्वापार आणि कली अशी ४ युगे आहेत. कलियुग ४ लाख ३२ सहस्र वर्षे आहे. त्याच्या अनुक्रमे २, ३ आणि ४ पट अनुक्रमे द्वापर, त्रेता आणि कृत ही युगे आहेत. या ४ युगांनी मिळून एक महायुग होते. अर्थात् ते कलियुगाच्या १० पट असते. महायुग ४३ लाख २० सहस्र वर्षांचे आहे. अशी १ सहस्र महायुगे मिळून १ कल्प होते. हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो. एका कल्पात १४ मनू होतात. प्रत्येक मनुत ७१ महायुगे होतात. चालू असलेले मन्वंतर (मनू) ७ वे असून यातील २७ महायुगे जाऊन २८ वे महायुग चालू आहे. कलियुगाच्या एकंदरीत वर्षांतून आज ५ सहस्र १२५ वर्षे मागे पडली. अजून ४ लाख २६ सहस्र ८७५ वर्षे शेष आहेत.’ (Gudi Padwa 2024)

(संदर्भ : सनातन संस्था)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.