एरव्ही आपल्या सणांना (hindu culture) गोड-धोड नैवेद्य दाखवले जातात. गुढीपाडव्याचा नैवेद्य मात्र कडू नैवेद्य नाही म्हणता येत नाही; म्हणून थोडासाच खातात. गुढीला असा कडू नैवेद्य दाखवण्यामागेही कारणे आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत वाढणाऱ्या उष्णतेचा विचार करून हा नैवेद्य ठरवला गेलेला आहे. शरीरात वाढणाऱ्या उष्णतेवर कडूलिंब (neem) हा उपचार आहे. त्यामुळेच तो गुढीवरही विराजमान आहे. (Gudi Padwa 2024)
(हेही वाचा – DCM Devendra Fadanvis : गुढीपाडव्याच्या दिवशी फडणवीस करणार ठाण्यातील भाजपाच्या कार्यालयाचे उद्घाटन)
गुढीला कडूलिंबाची पाने का लावतात ?
कडूलिंब हा कडू असला, तरी तो गुणकारी आहे. सत्य हेसुद्धा कडू असते. यासाठी गुढीला ते लावतात. हा वनस्पतीचा सत्कार आहे.
आयुर्बलं यशो वर्चः प्रजाः पशुवसूनि च ।
ब्रह्म प्रज्ञां च मेधां च त्वं नो देहि वनस्पते ॥ – अश्वत्थस्तोत्र, श्लोक १२
अर्थ : हे वनस्पते, तू आम्हाला आयुष्य, बळ, यश, तेजस्विता, प्रजा, पशू, संपत्ती आणि त्याचप्रमाणे ब्रह्माला जाणण्याची अन् आकलन करण्याची तेजस्वी बुद्धी दे.
अशी प्रार्थना गुढीला केली जाते. अशा प्रकारे ‘वनस्पतीमध्ये किती सामर्थ्य आहे’, हे दिसून येते. तिचा सत्कार होण्यासाठी तिला या सणाच्या दिवशी महत्त्व दिले जाते.
कडूलिंबाचा प्रसाद आहे गुणकारी
‘चैत्र महिना उन्हाळ्यात येतो. या उन्हाळ्याचा त्रास होऊ नये; म्हणून एक औषध सांगितले आहे. पाडव्याच्या दिवशी हे औषध सर्वांनी घ्यायचे असते. ज्यांना उन्हाळ्याचा त्रास होतो, त्यांनी नंतरसुद्धा हे औषध घ्यायला आडकाठी नाही.
पारिभद्रस्य पत्राणि कोमलानि विशेषतः ।
सपुष्पाणि समानीय चूर्णं कुर्यादि्वधानतः।।१।।
मरीचिहिंगुलवणमजमोदा च शर्करा ।
तिंतिणीमेलनं कृत्वा भक्षयेद्दाहशांतये।।२।।
अर्थ : कडुलिंबाची कोवळी पाने आणि फुले, मिरे, हिंग, मीठ, कैरी, साखर अन् चिंच हे सर्व साहित्य एकत्र करून ते चांगले वाटावे आणि औषध म्हणून घ्यावे.
असे कडूलिंबाच्या त्या प्रसादाचे महत्त्व आयुर्वेदाने सांगितले आहे. जुन्या पानांत शिरा असतात आणि त्यामुळे त्यांच्यातील औषधी गुण अल्प होतो; म्हणून विशेषकरून मिळतील तितकी कोवळी पानेच घ्यावीत. (Gudi Padwa 2024)
(संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, उत्सव आणि व्रते’)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community