महायुतीचा धर्म पाळलाच पाहिजे. ही देशाची निवडणूक (Lok Sabha 2024) आहे, लक्षात ठेवा, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आग्रहाची विनंती केली आहे. पक्षातील नाराजीच्या नाट्यसत्रानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर सभेत महायुतीसह (Mahayuti) सर्वच पदाधिकाऱ्यांना विनंती केली. मावळ लोकसभेत महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे (Shreeranga Barne) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे या संदर्भातील महायुतीची समन्वय समितीची बैठक बोलावण्यात आली होती. याच बैठकीत अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना आग्रहाची विनंती केली. (DCM Ajit Pawar)
(हेही पाहा – Raj Thackeray : मनसेचा मंगळवारी पाडवा मेळावा; राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष )
पवारांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना कडक शब्दात सुनावले
यावेळी उपमुख्यमंत्री सभेत म्हणाले की, विरोधी उमेदवाराला प्रचारादरम्यान भेटायला जाऊ नका. विरोधकांकडून नको ते मुद्दे उचलले जात आहेत. त्याला काही अर्थ नाही. आपली महायुती आहे, १३ तारखेपर्यंत निवडणूक होईपर्यंत कोणीच कुणाला भेटायला जाऊ नका. मी तसले काही ऐकून घेणार नाही. महायुतीचा धर्म पाळायला हवा. मैत्री, नाते-गोते, भावकी-रावकी बाजूला ठेवा. ही निवडणूक देशाची आहे, लक्षात ठेवा, असे थेटपणे सांगत अजित पवारांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना कडक शब्दात सुनावले. (DCM Ajit Pawar)
(हेही वाचा – Swatantra Veer Savarkar Film : पनवेलमधील २ हजार नागरिकांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन )
भूलथापांना बळी पडू नका
तसेच, विरोधी उमेदवार (संजोग वाघेरे) (Sanjog Waaghere) कदाचित असे सांगेल की, अजित पवारांनी मला उभे राहायला सांगितले आहे. असे अजिबात नाही. संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, मी असे काही करत नाही. आपले उमेदवार हे श्रीरंग बारणे आहेत, धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबा. भूलथापांना बळी पडू नका, असेही उपमुख्यमंत्री पवार भर सभेत बोलले. (DCM Ajit Pawar)
हेही पाहा –