सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान आहे. १२ ते १९ एप्रिल दरम्यान उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत. दरम्यान, निवडणुकीसाठी नियुक्त पोलिस व इतर कर्मचाऱ्यांना त्याच ठिकाणी मतदान करता येणार असून त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्या नियोजनानुसार अंदाजे ३० ते ३५ हजार कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
सीमेवरील सैनिकांना मात्र ऑनलाइन मतपत्रिका पाठविल्या जातात आणि त्यांनी मतदान केल्यानंतर त्या मतपत्रिका टपालाने जिल्ह्याला येतात. त्यांच्याच मतपत्रिका पोस्टाने आणल्या जातात, इतरांच्या नाही असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, एका वृत्तवाहिनीला दिली.
(हेही वाचा – Shops : दुकान आणि कंपन्यांचे नामफलक मराठीत नाही, तर मग भरा दुप्पट मालमत्ता कर )
लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिक्षकांसह सर्वच शासकीय विभागांकडील १८ ते २२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. दुसरीकडे शहर व जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने १५ हजारांचा पोलिस बंदोबस्त देखील नेमला जाणार आहे. सध्या ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग व ८५ वर्षांवरील ज्येष्ठांना घरी बसून की केंद्रावर येऊन मतदान करायचे आहे, यासंदर्भातील अर्ज भरून घेतले जात आहेत. निवडणुकीत प्रत्येकांनी मतदान करावे, अशी जिल्हा प्रशासनाची अपेक्षा आहे. त्यासाठी मतदान केंद्रांवरील शासकीय कर्मचारी व पोलिसांनादेखील त्याच ठिकाणी मतदान करता येणार आहे. त्याची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार असल्याचीही माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community