OnePlus Nord CE4 : १ टेराबाईटचं स्टोरेज देणारा हा फोन आहे स्वस्तात मस्त 

OnePlus Nord CE4 : एप्रिलमध्ये भारतात वनप्लसचा नवीन फोन लाँच झाला आहे 

1007
OnePlus Nord CE4 : १ टेराबाईटचं स्टोरेज देणारा हा फोन आहे स्वस्तात मस्त 
OnePlus Nord CE4 : १ टेराबाईटचं स्टोरेज देणारा हा फोन आहे स्वस्तात मस्त 
  • ऋजुता लुकतुके

चिनी कंपनी वन प्लसने अलीकडेच भारतात आपला नॉर्ड सीई४ हा अत्याधुनिक फोन लाँच केला. आपले आवडते गेम, मिम्स आणि इतर डिजिटल गोष्टी या फोनमध्ये जपून ठेवा, त्या डिलिट करू नका, अशीच या फोनची जाहिरात आहे. त्यावरून तुम्हाला फोनचा युएसपी लक्षात आलाच असेल. फोनमध्ये अगदी १ टेराबाईट पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. प्राथमिक फोनमधील स्टोरेज मात्र १२८ जीबी आणि २५६ जीबी इतकं असेल. कार्ड स्लॉटमुळे ते तुम्हा १ टेराबाईट पर्यंत वाढवू शकाल.. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७ जनरेशन ३ चिपसेट असलेला हा फोन आहे. त्यामुळे फोनची कार्यक्षमताही जास्त आहे. (OnePlus Nord CE4)

(हेही वाचा- Mumbai Share Market: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्सने केला ७५ हजारांचा टप्पा पार)

१ टेराबाईट स्टोरेजबरोबरच फोनमध्ये ८ जीबीची रॅम आहे. आणि ही क्षमताही १२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. भारतात सिलेडॉन मार्बल आणि क्रोम कलर अशा दोन रंगांत भारतात हे फोन उपलब्ध आहेत. (OnePlus Nord CE4)

फोनचा डिस्प्ले ६.७ इंच एमोल्ड डिस्प्ले आहे. तर रिफ्रेश रेट आहे १२०० हर्ट्झचा. फोनच्या मागच्या बाजूला दोन कॅमेरे आहेत. यातील प्राथमिक कॅमेरा ५० मेगा पिक्सलचा तर अल्ट्रावाईड लेन्स १६ मेगापिक्सेल क्षमतेची आहे. सेल्फी कॅमेरा ८ मेगा पिक्सेलचा आहे. कॅमेरातील लेन्स ही सोनीची आणि उच्च दर्जाची आहे. फोनची बॅटरी ही ५,००० एमएअच क्षमतेची आहे. आणि फोनबरोबर ८० वॅट क्षमतेचा वायर असलेला चार्जर कंपनीने देऊ केला आहे. फोनची ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉईड १३ आहे. (OnePlus Nord CE4)

(हेही वाचा- Cricket Kit : क्रिकेटमधील ५ सर्वोत्तम किट्स कुठली?)

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फोनची किंमत ही २४,९९९ रुपयांपासून सुरू होते. तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज असलेला फोन २६,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. (OnePlus Nord CE4)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.