Infinix Note 40 Pro Series : इन्फिनिक्स नोट ४० प्रो आणि प्रो प्लस हे दोन फोन भारतात लाँचसाठी तयार 

Infinix Note 40 Pro Series : पहिल्या दिवशी खरेदी करणाऱ्यांना मिळणार अर्ली बर्ड प्राईस 

295
Infinix Note 40 Pro Series : इन्फिनिक्स नोट ४० प्रो आणि प्रो प्लस हे दोन फोन भारतात लाँचसाठी तयार 
Infinix Note 40 Pro Series : इन्फिनिक्स नोट ४० प्रो आणि प्रो प्लस हे दोन फोन भारतात लाँचसाठी तयार 
  • ऋजुता लुकतुके

इन्फिनिक्स नोट ४० प्रो ५जी (Infinix Note 40 Pro Series) आणि इन्फिनिक्स नोट ४० प्रो प्लस असे दोन नवीन फोन येत्या १२ एप्रिलला भारतात लाँच होत आहेत. आणि पहिल्याच दिवशी या फोनची नोंदणी करणाऱ्यांसाठी कंपनीने एकूण ४,९९९ रुपयांची दोन अर्ली बर्ड प्रायझेसही देऊ केली आहेत. यात लेदर केस आणि मॅगकिट मिळणार आहे. सुरुवातीला फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटवर फोनची विक्री सुरू होणार आहे. फोनबरोबर सुरुवातीला मिळणाऱ्या मॅगकिटमध्ये पॉवरबँक असेल. (Infinix Note 40 Pro Series)

(हेही वाचा- Mumbai Share Market: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्सने केला ७५ हजारांचा टप्पा पार)

या दोन्ही फोनमध्ये मॅक्सचार्ज तंत्रज्जनाचा वापर करण्यात आलाय. त्यामुळे १०० वॅट क्षमतेचं चार्जिंग यात शक्य होतं. १२ जीबी रॅम असलेल्या या फोनमध्ये गरज पडल्यास १२ जीबींची क्लाऊड रॅमही वापरता येऊ शकेल. फोनमध्ये इन्फिनिक्स कंपनीचा चिता चिपसेट असेल. वक्राकार एमोल्ड डिस्प्ले बरोबरच यात गोरिला ग्लास सुरक्षाही आहे. मीडियाटेक तंत्रज्जानाचाही प्रभावी वापर या फोनमध्ये करण्यात आलाय. आणि फोनमधील तीनही कॅमेरे हे १०८ मेगापिक्सेल क्षमतेचे आहेत. सेल्फी कॅमेरा मात्र ३२ मेगापिक्सेलचा आहे. (Infinix Note 40 Pro Series)

(हेही वाचा- OnePlus Nord CE4 : १ टेराबाईटचं स्टोरेज देणारा हा फोन आहे स्वस्तात मस्त )

नोट प्रो फोन हा २४,००० रुपयांना उपलब्ध आहे. तर फोनमधील व्हेंटेज ग्रीन पर्याय हा २६,००० रुपयांपासून सुरू होतो. फोनमधील डिस्प्ले ६.७ इंचांचा एमोल्ड डिस्प्ले आहे. तर बॅटरी ही ५,००० एमएएच क्षमतेची आहे. जास्तीत जास्त २५६ जीबीचं स्टोरेज फोनमध्ये उपलब्ध आहे. गेल्या महिन्यात जागतिक स्तरावर दोन्ही फोन लाँच झाले आहेत. आणि तिथे अल्पावधीत लोकप्रियही झाले आहेत. (Infinix Note 40 Pro Series)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.