Lok Sabha Election 2024: मविआच्या पत्रकार परिषदेत जागावाटप जाहीर, कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या…

220
‘मुस्लिम तुष्टीकरण’ छाप Congress च्या जाहिरनाम्याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटप जाहीर करण्यात आले. त्यानुसार सांगलीची जागा ठाकरे गट, तर भिवंडी राष्ट्रवादी लढवणार असल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेस १७, राष्ट्रवादी काँग्रेस १०, तर शिवसेना (उबाठा) २१ जागा लढवणार आहे. उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी हे जागावाटप जाहीर केले. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषदेला उपस्थिती होती. मुंबईमध्ये तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत अंतिम जागावाटप जाहीर केले. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Infinix Note 40 Pro Series : इन्फिनिक्स नोट ४० प्रो आणि प्रो प्लस हे दोन फोन भारतात लाँचसाठी तयार )

कोणत्या पक्षाला किती जागा?
शिवसेना- २१ जागा
जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलडाणा, हातगकणंगले, संभाजी नगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य

काँग्रेस- १७ जागा
नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गडचिरोरी, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई

शरद पवार गट- १० जागा
बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अमहमदनगर दक्षिण, बीड

मुंबईतील शिवालय येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर घटक पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, जयंत पाटील, संजय राऊत यावेळी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेआधी काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांची स्वतंत्र बैठक झाली होती. महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह माकप, भाकप, आप, समाजवादी पक्ष सहभागी असल्याचं सांगण्यात आलं.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.