IPL 2024, Jasprit Bumrah : सातत्यपूर्ण जसप्रीत बुमराने आयपीएलमध्ये सर केला नवीन उच्चांक 

IPL 2024, Jasprit Bumrah : अचूकते बरोबरच मोक्याच्या क्षणी बळी मिळवण्यात बुमरा  तरबेज आहे 

235
IPL 2024, Jasprit Bumrah : सातत्यपूर्ण जसप्रीत बुमराने आयपीएलमध्ये सर केला नवीन उच्चांक 
IPL 2024, Jasprit Bumrah : सातत्यपूर्ण जसप्रीत बुमराने आयपीएलमध्ये सर केला नवीन उच्चांक 
  • ऋजुता लुकतुके

भारताचा सध्याचा तेज गोलंदाजीचा आधारस्तंभ जसप्रीत बुमरा आयपीएलमध्येही जीव तोडून गोलंदाजी करतोय. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या बुमराने मागचे १० हंगाम मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळताना एक अजोड कामगिरी केली आहे. एकाच फ्रँचाईजीकडून वेगवान १५० बळी मिळवण्याची किमया त्याने केली आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय आहे. मुंबई संघाने यंदाच्या आयपीएलमधील आपला पहिला विजय रविवारी दुपारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध नोंदवला. या सामन्यातच बुमराने या कामगिरीला गवसणी घातली.  (IPL 2024, Jasprit Bumrah)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: मविआच्या पत्रकार परिषदेत जागावाटप जाहीर, कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या…)

सामन्यात त्याने २ बळी घेतले. २०१३ मध्ये जसप्रीत बुमरा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फ्रँचाईजीकडे आला. त्यानंतर तो इथेच रुळला आहे. आयपीएलच्या इतिहासात फार कमी खेळाडू एकच एक फ्रँचाईजीकडून खेळले आहेत. त्यातील एक बुमरा आहे. (IPL 2024, Jasprit Bumrah)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : ॲड. प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर चिन्ह !)

एकाच फ्रँचाईजीसाठी दीडशे बळी मिळवणारा बुमरा पहिला भारतीय असला तरी लसिथ मलिंगा आणि सुनील नरेन या परदेशी खेळाडूंनी यापूर्वी अशी कामगिरी केलेली आहे. मलिंगाने (Malinga) मुंबई इंडियन्सकडून खेळताना १७० बळींची मजल मारली. तर सुनील नरेनने कोलकाता संघासाठी १६६ बळी मिळवले आहेत. विशेष म्हणजे मलिंगा हा सुरुवातीला बुमराचा आदर्श होता दोघांची स्लिंग शैली सारखीच आहे. मलिंगाने मुंबई फ्रँचाईजीमध्ये एकत्र असताना बुमराला गोलंदाजीचा कानमंत्रही दिला होता. (IPL 2024, Jasprit Bumrah)

(हेही वाचा- IPL 2024, Mayank Yadav : पोटाच्या दुखापतीमुळे मयंक यादव दिल्ली विरुद्धच्या पुढील सामन्याला मुकणार)

बुमराच्या नंतर एकाच फ्रँचाईजीसाठी सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज आहे यजुवेंद्र चहल. त्याने सनरायझर्स हैद्राबादसाठी १३९ बळी घेतले आहेत. तर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) मुंबईसाठी १२७ बळी घेतले आहेत. बुमराने रविवारी आधी जम बसलेल्या पृथ्वी शॉला बाद केलं. तर काही वेळाने ४१ धावांवर खेळणाऱ्या अभिषेक पोरेललाही बाद केलं. (IPL 2024, Jasprit Bumrah)

हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.