देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यामुळे अकोला मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्यांना निवडणूक आयोगाकडून प्रेशर कुकर चिन्ह मिळाले आहे. तसेच वंचितच्या अन्य उमेदवारांना रोड रोलर, शिट्टी, कपाट हे चिन्ह मिळाले आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – IPL 2024, Mayank Yadav : पोटाच्या दुखापतीमुळे मयंक यादव दिल्ली विरुद्धच्या पुढील सामन्याला मुकणार)
ॲड. आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघात ‘प्रेशर कुकर’ हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवणार आहेत. आंबेडकर (Prakash Ambedkar) स्वतः उमेदवार असल्याने हा मतदारसंघ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय होत आहे. वंचित बहुजन आघाडीची ताकद पाहता यंदा आंबेडकरांच्या बाजूने निकाल लागणार अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे या मतदार संघाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. तसेच आंबेडकर यांना मिळालेल्या कुकर चिन्हामुळे अनेकांचे प्रेशर वाढले आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community