अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवार, ९ एप्रिल रोजी तामिळनाडूतील अनेक शहरांमध्ये छापे टाकले. द्रविड मुनेत्र कळघमचे (डीएमके, DMK) माजी पदाधिकारी जाफर सादिक (Jafar Sadiq) आणि इतरांवर ही कारवाई करण्यात आली. अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणाच्या तपासाचा एक भाग म्हणून छापा टाकण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (ED Raids Tamilnadu)
(हेही वाचा – Swatantryaveer Savarkar : भगूर येथे उभारण्यात आली हिंदुत्वाची गुढी !)
3,500 किलो स्यूडोफेड्रिनच्या तस्करीत सहभाग
ईडीचे अधिकारी निमलष्करी दलांसह, राज्यातील चेन्नई, मदुराई आणि तिरुचिरापल्लीमध्ये 25 परिसरांची झडती घेत आहेत. जाफर सादिक, चित्रपट दिग्दर्शक अमीर आणि इतर काहींच्या घरावर छापे टाकण्यात येत आहेत. सादिक हा तमिळ चित्रपटांचा निर्माताही असल्याची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीच्या तपासासंदर्भात एनसीबीने (NCB) सादिकला गेल्या महिन्यात अटक केली होती. त्याला 3,500 किलो स्यूडोफेड्रिनच्या तस्करीत सहभाग असल्याबद्दल अटक करण्यात आली होती. बाजारात या मालाची किंमत 2 हजार कोटींहून अधिक आहे.
सादिकचे तमिळ आणि हिंदी चित्रपट उद्योगाशी संबंध
स्यूडोफेड्रिन हे रसायन अमली पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाते. ईडीने या प्रकरणाची आणि एनसीबीच्या इतर काही एफआयआरची दखल घेतली. यानंतर सादिक आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. एनसीबीने सांगितले की, सादिकचे तमिळ आणि हिंदी चित्रपट उद्योगाशी संबंध आहेत. काही हाय प्रोफाईल लोक, तसेच राजकीय वित्तपुरवठ्याची काही प्रकरणे एजन्सीच्या स्कॅनरखाली आहेत. सादिक यांची फेब्रुवारीमध्ये सत्ताधारी डीएमके पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. एनसीबीने त्याचे नाव ड्रग्ज नेटवर्कशी जोडल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. (ED Raids Tamilnadu)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community