पावसाळापूर्व नाल्यांची सफाई करताना मिठी नदीच्या सफाईचे कामही जोरात सुरु असून मंगळवारी महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मंगळवारी ९ एप्रिल २०२४ रोजी पाहणी करून आढावा घेतला. ठरल्या वेळापत्रकानुसार मे अखेर गाळ काढण्याची कामे पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच आपल्या या पहिल्याच पाहणी दौऱ्यात त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना पावसाळापूर्व कामांना वेग देण्याच्या सूचनाही केल्या. (BMC)
(हेही वाचा – BMC: मुंबई महापालिकेच्या आयुक्तांसमोर अपेक्षांचा डोंगर !)
‘मिठी’ १ लाख १७ हजार ९७० मेट्रिक टन काढला गाळ
मिठी नदीतील गाळ उपसण्याचे काम द्विवार्षिक कंत्राटाद्वारे करण्यात येते. प्रतिवर्षी महानगरपालिकेतर्फे मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम दोन टप्प्यांमध्ये (एकूण वार्षिक परिमाणाच्या ८० टक्के पावसाळ्यापूर्वी व २० टक्के पावसाळ्यादरम्यान/पावसाळ्यानंतर) करण्यात येते. त्यानुसार सन २०२४ या वर्षाकरीता सुमारे २ लाख ७० हजार मेट्रिक टन इतका गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातील टप्पा-१ (पावसाळ्यापूर्वी) मधील गाळ काढण्याची कामे प्रगतिपथावर आहेत. मिठी नदीची टप्पा-१ (पावसाळ्यापूर्वी) मधील गाळ काढण्याची कामे जानेवारी २०२४ पासून सुरू करण्यात आली आहेत. एकूण २ लाख १६ हजार १७४ मेट्रिक टन इतका गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आजमितीस सुमारे १ लाख १७ हजार ९७० मेट्रिक टन (५४.५७ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे. उर्वरित गाळ दिनांक ३१ मे २०२४ पर्यंत काढण्यात येईल. (BMC)
(हेही वाचा – BMC : नालेसफाईच्या कामांमध्ये कुचराई झाल्यास यंदा मुंबईकर जाणार पुरात वाहून)
भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण प्रक्रियेचाही घेतला आढावा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भांडुप जलशुद्धीकरण संकुलास महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मंगळवारी भेट देऊन संकुलाची रचना आणि जलशुद्धीकरण प्रक्रिया यांची माहिती जाणून घेतली. आशिया खंडातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र म्हणून प्रख्यात असलेल्या या संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबईच्या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो. भांडूप संकुल येथे १ हजार ९१० दशलक्ष लीटर आणि ९०० दशलक्ष लीटर पाणी शुद्धीकरण करणारी दोन युनिट्स आहेत. (BMC)
पवई तलाव परिसराला भेट
गगराणी यांनी पवई तलाव आणि परिसराची पाहणी केली. तलाव आणि परिसरात सुरू असलेल्या पर्यावरण संवर्धन उपाययोजनांची सद्यस्थिती त्यांनी जाणून घेतली. तलावाला लागूनच असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये (पवई) देखील फेरफटका मारून त्यांनी पाहणी केली. त्यानंतर पवई तलाव येथे गणेश घाट (श्री गणेश नगर विसर्जन घाट) बाजूस भेट देवून जलपर्णी कढण्याची कामे कशा रीतीने सुरू आहेत, त्याचाही आढावा घेतला. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community