World Homeopathy Day : जागतिक होमिओपॅथी दिवसाचे काय आहे महत्त्व ?

253
World Homeopathy Day : जागतिक होमिओपॅथी दिवसाचे काय आहे महत्त्व ?
World Homeopathy Day : जागतिक होमिओपॅथी दिवसाचे काय आहे महत्त्व ?
१० एप्रिल रोजी दरवर्षी ‘जागतिक होमिओपॅथी दिन’ साजरा केला जातो. होमिओपॅथी वैद्यकीय प्रणालीबद्दल लोकांना जागरूक करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. जगभरात कोणत्याही प्रकारच्या उपचारांसाठी केवळ ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद आणि निसर्गोपचार पद्धतींचा अवलंब केला जातो. सध्या लोक आजारांवर उपचार फक्त ॲलोपॅथी म्हणजेच आधुनिक वैद्यकीय पद्धतीद्वारे करतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यातून मिळणारा जलद परिणाम. मात्र, आता लोकांचा होमिओपॅथीवरील विश्वास वाढला असून ते त्यावर विश्वास ठेवून उपचार घेत आहेत. (World Homeopathy Day)
होमिओपॅथीचे संस्थापक जर्मन चिकित्सक डॉ. ख्रिश्चन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनेमन यांचा १० एप्रिल रोजी जन्मदिन असतो. १० एप्रिल १७५५ मध्ये त्यांचा जन्म झाला. ते एक महान शास्त्रज्ञ होते आणि रोग बरे करण्याचा मार्ग म्हणून होमिओपॅथी शोधण्याचे श्रेय त्यांना दिले जातो. त्यांचा सन्मान करण्यासाठी या दिवशी जागतिक होमिओपॅथी दिन साजरा केला जातो.
अनेक आजारांवर चांगले काम
होमिओपॅथीने अनेक आजारांवर चांगले काम केले आहे. होमिओपॅथीने लहान मुलांशी संबंधित आजार, प्रसूती आणि स्त्रीरोग, मानसिक आरोग्य आणि सांधेदुखी, यकृत संबंधित समस्या, ऍसिडिटी समस्या, संसर्गजन्य रोग इ. यासह, कोविड काळात त्याचे उपचार रामबाण उपाय म्हणून समोर आले होते.  होमिओपॅथी ही होमिओपॅथी सेंट्रल कौन्सिल कायदा, १९७३ नुसार भारतातील एक मान्यताप्राप्त औषध प्रणाली आहे.
भारतासह जगातील अनेक भागांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. बरेच लोक ॲलोपॅथीपेक्षा होमिओपॅथीला प्राधान्य देतात. कोणताही कार्यक्रम आणि दिवस साजरा करण्यासाठी एक थीम ठरवली जाते. जेणेकरुन तो दिवस साजरा करताना जोम येतो आणि निश्चित दिशा प्राप्त होते. जागतिक होमिओपॅथी दिन 2024 साठी एक थीम देखील ठेवण्यात आली आहे. यंदाची थीम ‘होमिओपरीवार: एक आरोग्य, एक कुटुंब’ अशी आहे. (World Homeopathy Day)
हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.