राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीतील मनसेच्या सहभागाविषयी चालू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी मनसेच्या (MNS) इंजिन या चिन्हाशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे सांगत राज ठाकरे यांनी शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी आणि देशाला खंबीर नेतृत्व मिळावे, यासाठी हा पाठिंबा दिल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. (Raj Thackeray Devendra Fadnavis)
(हेही वाचा – Raj Thackeray : नरेंद्र मोदींसाठी राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा; विधानसभेसाठी कामाला लागण्याचे मनसैनिकांना आवाहन )
संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या
राज ठाकरे यांच्या या निर्णयाचे भाजपाच्या अनेक नेत्यांनी स्वागत केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’या माध्यमावर पोस्ट करत राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की,
सस्नेह स्वागत !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत,
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी,
भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी,
भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख श्री राज ठाकरे जी यांचा अत्यंत आभारी आहे.
आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशाआकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या!
सस्नेह स्वागत !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत,
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी,
भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी,
भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख श्री राज ठाकरे जी यांचा अत्यंत…— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 9, 2024
भाजपा नेते विनोद तावडे यांनीही महायुतीत राज ठाकरे यांचे स्वागत केले आहे. (Raj Thackeray Devendra Fadnavis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community