-
ऋजुता लुकतुके
मोटोरोला मोबाईल फोन उत्पादक कंपनीने रेझर फोल्ड सीरिजपासून या बाजारपेठेत मोठी क्रांती घडवून आणली आहे. तेव्हापासून कंपनीच्या प्रत्येक नवीन मॉडेलविषयी ग्राहकांना उत्सुकता असते. आणि कंपनी ग्राहकांच्या कसोटीला खरी उतरतेही. आता कंपनीचा नवीन फोन मोटोरोला एज ५० प्रो (Motorola Edge 50 Pro) बाजारात आला आहे. पूर्वीच्या एज ३० आणि एज ४० या सीरिजना ग्राहकांनी उचलून धरलं होतं. त्यामुळे या सीरिजलाही चांगली सुरुवात मिळेल असा कंपनीचा होरा आहे.
फोनची चौकट ही सिलिकॉन व्हिगान लेदरची आणि ॲल्युमिनिअमची बनलेली आहे. त्यामुळे फोनचा लुक आकर्षक आहे आणि वजनही कमी आहे. शिवाय फोनच्या मागच्या बाजूला आहेत तीन कॅमेरे आणि दोन एलईडी फ्लॅश लाईट. ही चौकटही आकर्षक अशीच आहे. या फोनला आयपी६८ प्रमाणपत्र मिळालं आहे. याचा अर्थ हा फोन धूळ, पाणी आणि वातावरणातील इतर गोष्टींपासून सुरक्षित आहे.
(हेही वाचा – Toyota Taisor : निक्सॉन आणि फ्रॉक्सशी स्पर्धा करणारी टोयोटाची टेसर भारतात लाँच)
Motorola Edge 50 Pro discounted prices are shockingly good.
8/256GB – Rs 27,999
12/256GB – Rs 29,999The actual retail price is higher. See the image. #Edge50Pro pic.twitter.com/ctv8Uxt1G0
— Ershad Kaleebullah (@r3dash) April 3, 2024
या फोनचा डिस्प्ले ६.७ इंचांचा आहे. Eआणि पोल्ड थ्री-डी कर्व्ह्ड डिस्प्ले ही फोनची खासियत आहे. तर स्क्रीनवर अगदी हुबेहूब रंग छटा दिसतात असं प्रमाणपत्र पँटॉन संस्थेनं दिलं आहे. अगदी मानवी त्वचेच्या वेगवेगळ्या छटाही इथं हुबेहूब दिसतात, असा कंपनीचा दावा आहे. १.५ के सुपर एचडी रिझ्युलेशनमुळे डिस्प्ले अगदी सुस्पष्ट आहे. १४४ हर्ट्झच्या रिफ्रेश रेटमुळे स्क्रोलिंगही वेगवान आहे.
एसजीएस आय प्रोटेक्शन तंत्रज्जानामुळे अतीवापरानंतरही डोळ्यांना त्या मानाने थकवा जाणवत नाही. अँड्रॉईड १४ या प्रणालीवर हा फोन चालतो. आधीच्या ४० आणि ३० एज फोनमध्ये असलेला मीडियाटेक हा प्रोसेसर वापरणं कंपनीने एज ५० प्रो पासून बंद केलंय. आता कंपनी स्नॅपड्रॅगन ७ जनरेशन ३ चिपसेट वापरतेय. फोनमधील कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा आहे. आणि फोन ८ आणि १२ रॅम तसंच १२६ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. या फोनची किंमत ३१,९९९ रुपयांपासून सुरू होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community