IPL 2024, Ravindra Jadeja : रवींद्र जाडेजाला ‘क्रिकेट थलपथी’ नाव कसं मिळालं?

जाडेजाने कोलकाता विरुद्ध १८ धावांत ३ बळी मिळवले

267
IPL 2024, Ravindra Jadeja : रवींद्र जाडेजाला ‘क्रिकेट थलपथी’ नाव कसं मिळालं?
IPL 2024, Ravindra Jadeja : रवींद्र जाडेजाला ‘क्रिकेट थलपथी’ नाव कसं मिळालं?
  • ऋजुता लुकतुके

आतापर्यंत या आयपीएलमध्ये (IPL 2024) फारशी चमक दाखवू न शकलेला रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात मात्र चमकला. आणि त्याने संघ सहकाऱ्यांकडून स्वत:ला क्रिकेट थलपथी हे नावंही मिळवलं. कोलकाता संघाला निर्धारित २० षटकांत ९ बाद १३७ धावांत रोखण्यात जाडेजाने मोठा वाटा उचलला. त्याने ४ षटकांत १९ धावा देत तीन बळी मिळवले. त्यानंतर चेन्नईने हे आव्हान अठराव्या षटकातच पार करत सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला.

या कामगिरीसाठी जाडेजाला सामनावीर पुरस्कार मिळाला. पुरस्कार सोहळ्यात जाडेजाला प्रश्न विचारण्यात आला की, जसं धोनी चेन्नई सुपरकिंग्जचा ‘थला’ आहे. आणि सुरेश रैना ‘चिन्ना थला’ आहे. तसा जाडेजा कोण आहे? खरंतर जाडेजाला खाजगीत ‘क्रिकेट थलपथी’ म्हटलं जातं. जाडेजाने प्रश्नाचं उत्तर देताना गंमतीने म्हटलं की, ‘मला नाव आहे. पण, ते अजून संघाकडून अधिकृत झालेलं नाही.’ पण, जाडेजाच्या या मुलाखतीनंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाने तातडीने जाडेजाच्या बोलण्याची दखल घेतली. काही मिनिटांतच चेन्नई फ्रँचाईजीच्या सोशल मीडिया हँडलवर रवींद्र जाडेजाचा (Ravindra Jadeja) फोटो झळकला. आणि त्यावर लिहिलं होतं, ‘व्हेरिफाईड. जाडेजा संघाचा क्रिकेट थलपथी आहे.’

(हेही वाचा – Ahmednagar: मांजरीचा जीव वाचताना बायोगॅसच्या २०० फूट खोल खड्ड्यात पडून ५ जणांचा मृत्यू)

चेन्नईच्या चेपक मैदानावरील खेळपट्टी फिरकीला साथ देणारी आहे. आणि इथं रवींद्र जाडेजाची (Ravindra Jadeja) गोलंदाजी नेहमीच प्रभावी ठरली आहे. आताही गोलंदाजीविषयी जाडेजा समाधानी होती. ‘चेन्नईत गोलंदाजी करणं मला आवडतं. इथं चेंडूवर चांगली पकड मिळवता येते. आणि बरोबर जागेवर चेंडू पडले. तर बळीही मिळवता येतात. याउलट पाहुण्या संघाला मात्र गोलंदाजीची लय सापडणं थोडं कठीण जातं,’ असं जाडेजा कामगिरीविषयी बोलताना म्हणाला.

अलीकडेच जाडेजाने आयपीएलमध्ये १०० झेल घेण्याचा टप्पा पार केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.