Dhirendra Krishna Shastri: पुन्हा सर तन से जुदा; बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना फेसबुकवरून मिळाली धमकी

193
Dhirendra Krishna Shastri : पुन्हा सर तन से जुदा; बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना फेसबुकवरून मिळाली धमकी
Dhirendra Krishna Shastri : पुन्हा सर तन से जुदा; बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना फेसबुकवरून मिळाली धमकी

उत्तर प्रदेशातील बरेली (Bareilly) येथे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फेसबुकच्या माध्यमातून देण्यात आलेल्या या धमकीत ‘सिर तन से जुदा’ करण्याची धमकी आहे. याविषयी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बरेलीतील (Bareilly) आंवला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Dhirendra Krishna Shastri)

(हेही वाचा – ISRO: इस्रोचे पुढचे लक्ष्य चांद्रयान -४ मोहिमेवर केंद्रित, एस. सोमनाथ यांची माहिती)

हिंदुत्ववादी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या परिसरात जमले

पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांचा फोटो घेऊन एक व्हिडिओ आक्षेपार्ह पद्धतीने एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. यासोबत सर तन से जुदाचा ऑडिओ देखील लावण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे हिंदू संतप्त झाले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या वेळी हिंदुत्ववादी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते आंवला पोलिस ठाण्याच्या परिसरात जमले आणि त्यांनी धमकी देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. (Dhirendra Krishna Shastri)

(हेही वाचा – Toyota Taisor : निक्सॉन आणि फ्रॉक्सशी स्पर्धा करणारी टोयोटाची टेसर भारतात लाँच)

फैज रझाच्यावर गुन्हा दाखल

धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी फैज रझा (Faiz Raza) नावाच्या एका व्यक्तिविरुध्द कलम ५०२ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असुन कायदेशीर कारवाई केली जात आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. (Dhirendra Krishna Shastri)

सिर तन से जुदा नंतर झाले होते अनेकांचे शिरच्छेद

भाजप नेत्या नुपुर शर्मा  (Nupur Sharma) यांनी महंम्मद पैगंबर याचा कथित अवमान केल्याचा आरोप करुन धर्मांधानी देशभर ‘सिर तन से जुदा’ च्या घोषणा देत हिंदुंचा शिरच्छेद करण्याचे संतापजनक प्रकार २०२२ मध्ये देशभर घडले. आता पुन्हा पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांना मिळालेल्या धमकीनंतर ते लोण पुन्हा सुरू होते की काय, अशी भीती हिंदुंनी व्यक्त केली आहे.

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.