Lok Sabha Election 2024 : हातात कॉंग्रेसची कमांड; पण काडीची नाही डिमांड!

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही भाजपा उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचार केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आतापर्यंत सर्व लोकसभा मतदारसंघांना एक ना अनेक वेळा भेट दिली आहे.

218
Lok Sabha Election 2024 : हातात कॉंग्रेसची कमांड...पण काडीची नाही डिमांड!

लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. भाजपासह तमाम राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांची यादी सुध्दा जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रचार सभांचा सपाटा लावला आहे. याउलट, राहुल गांधी यांच्या फारशा प्रचारसभा होताना दिसत नाही. कारण, कॉंग्रेसच्या नेत्यांना प्रचारासाठी राहुल गांधी आणि कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नव्हे तर सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी हव्या आहेत. दोन-दोन पदयात्रा काढल्यानंतरही राहुल गांधी यांच्या वाट्याला ही उपेक्षा येत आहे. (Lok Sabha Election 2024)

राजस्थानमध्ये लोकसभेच्या २५ जागा आहेत. २०१९ च्या निवडणुकीत या सर्व जागांवर भाजपाचा झेंडा फडकला होता. आता पुन्हा एकदा भाजपा आणि कॉंग्रेस आमनेसामने आहे. मात्र, मजेची बाब अशी की कॉंग्रेसच्या एकाही मोठ्या नेत्याने राजस्थानमध्ये सभा घेतली नाही. राजस्थानमधील लोकसभेच्या सर्व २५ जागा जिंकण्यासाठी भाजपा पूर्ण प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आतापर्यंत तीन लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवारांच्या समर्थनार्थ जाहीर सभांना संबोधित केले आहे. येत्या दोन दिवसांत मोदी करौली-धोलपूर आणि बारमेर-जैसलमेर या जागांवर लक्ष केंद्रित करणार आहेत. (Lok Sabha Election 2024)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा निवडणुकीसाठी दोन दिवस राजस्थानच्या दौऱ्यावर गेले आहेत. शहा १४ एप्रिलला पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही भाजपा उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचार केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आतापर्यंत सर्व लोकसभा मतदारसंघांना एक ना अनेक वेळा भेट दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

राहुल गांधी यांनी एकदाही भेट दिली नाही

दुसरीकडे, कॉंग्रेसमधील सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे प्रमुख स्टार प्रचारक मानले जाणारे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी एकदाही राजस्थानच्या निवडणूक दौऱ्यावर आलेले नाहीत. यामागचे कारण काय? ही सुध्दा मजेदार बाब आहे. (Lok Sabha Election 2024)

कॉंग्रेस राजस्थानमध्ये २२ जागांवर लढत आहे. यातील ११ उमेदवारांनी हायकमांडकडे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या निवडणूक प्रचारसभांसाठी दौऱ्यांची मागणी केली आहे. अर्थात, काँग्रेसच्या उमेदवारांमध्येही काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याकडे राहुलपेक्षा जास्त मागणी आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे प्रमुख स्टार प्रचारक मानले जाणारे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी एकदाही राजस्थानच्या निवडणूक दौऱ्यावर आलेले नाहीत. (Lok Sabha Election 2024)

सोनिया गांधी यांनी जयपूरला भेट दिली

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे निवडणुकीसाठी दोनदा राजस्थानला गेले आहेत. मात्र, कोणत्याही उमेदवाराने त्यांच्या भेटीची मागणी केली नव्हती. पक्ष नेतृत्वाने आपल्या स्तरावर कार्यक्रम ठरवून उमेदवार पाठवले. अलीकडेच सोनियांनी खरगे आणि प्रियंका यांच्यासह जयपूरमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. निवडणूक प्रचारादरम्यान सोनियांनी पहिल्यांदा राजस्थानला भेट दिली तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Dhirendra Krishna Shastri: पुन्हा सर तन से जुदा; बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना फेसबुकवरून मिळाली धमकी)

उमेदवारांची स्थिती स्पष्ट केली

राज्यातील सर्व २५ जागांवर उमेदवारांची स्थिती स्पष्ट झाली आहे. २५ जागांसाठी २६६ उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण उमेदवारांची संख्या २४९ होती. पहिल्या टप्प्यात १२ जागांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणे आहे. यासाठी ११४ उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)

उर्वरित १३ जागांसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी होणाऱ्या निवडणुकीत १५२ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक १८ उमेदवार चित्तौडगड जागेवर तर किमान चार उमेदवार करौली-धोलपूरमध्ये निवडणूक लढवत आहेत. (Lok Sabha Election 2024)

काँग्रेसने या जागा सोडल्या

काँग्रेस २२ जागांवर निवडणूक लढवत आहे. काँग्रेसने नागौरची जागा राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष हनुमान बेनिवाल, सीकर सीपीआय(एम)चे अमर राम आणि बांसवाडा-डुंगरपूरची जागा भारत आदिवासी पक्षाच्या राजकुमार रोटसाठी सोडली आहे. (Lok Sabha Election 2024)

भाजपा राज्यातील सर्व २५ जागांवर निवडणूक लढवत आहे. पहिल्या टप्प्यात श्री गंगानगर, बिकानेर, चुरू, झुंझुनू, सीकर, जयपूर सिटी, जयपूर ग्रामीण, अलवर, करौली-धोलपूर, दौसा आणि नागौर या जागांवर निवडणूक होत आहे. दुसऱ्या टप्प्यात टोंक-सवाईमाधोपूर, अजमेर, जोधपूर, बारमेर, जालोर-सिरोही, उदयपूर, बांसवाडा-डुंगरपूर, चित्तोडगड, राजसमंद, भीलवाडा, कोटा आणि झालावाड-बरन या जागांवर मतदान होणार आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.