बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. पतंजली आयुर्वेदच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी झाली. कोर्टाने पुन्हा बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना फटकारलं. (Ramdev Baba)
न्यायालयात रामदेवबाबांनी माफी मागितली, मात्र ही माफी सर्वोच्च उच्च न्यायालयाने फेटाळून लावत रामदेव बाबांच्या शपथपत्राचा स्वीकार करण्यास नकार दिला. न्यायमूर्ती अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या बेंचने या प्रकरणाची सुनावणी घेतली. यावेळी न्यायालयाने म्हटले आहे की, तीन-तीन वेळेस आमच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे याचे परिणाम भोगावे लागतील, केंद्र सरकारने या प्रकरणात दाखल केलेल्या उत्तरावरही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
(हेही वाचा – Sangali चे विशाल पाटील ‘वंचित’च्या तिकिटावर लोकसभा लढणार?)
दरम्यान, बुधवारी झालेल्या सुनावणीच्या पूर्वी मंगळवारी रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी कोर्टासमोर बिनशर्त माफी मागितली होती. त्यापूर्वीच्या सुनावणीमध्ये कोर्टाने दोघांना फटकारलं होतं. स्वतःला कायद्यापेक्षा मोठं समजू नये, असा सल्ला कोर्टाने रामदेव बाबांना दिला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community