Lodha फ्रंटफूटवर Deora यांची ‘हॅट्रीक’?

भाजपाकडून राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नावे चर्चेत असून लोढा यांचे नाव आघाडीवर आहे.

269
Lodha फ्रंटफूटवर Deora यांची ‘हॅट्रीक’?

दक्षिण मुंबई मतदार संघातून महायुतीकडून कोण उमेदवार असणार, हे निश्चित झाले नसले तरी भाजपाचे मंगल प्रभात लोढा यांचे नाव आघाडीवर आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाकडून मात्र राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून देवरा यांना यशाची खात्री कमी आहे आणि विजय मिळाला नाहीच तर ‘अपयशाची हॅट्रीक’चा शिक्का लागू नये, या भीतीने ते फार इच्छुक नसल्याचे बोलले जाते. (Lodha)

लोढा जोरात, नार्वेकर मागे

महाविकास आघाडीने उमेदवारी घोषित करण्यात आघाडी घेतली असून महायुतीकडून अद्याप दक्षिण मुंबई मतदार संघाबाबत निर्णय होऊ शकला नाही. भाजपाकडून राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नावे चर्चेत असून लोढा यांचे नाव आघाडीवर आहे. लोढा हे लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर होत आहे. तसेच त्यांनी आपली संपर्क यंत्रणा कामाला लावली असण्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे नार्वेकर यांच्याबाबत पक्षाचे अंतर्गत सर्वेक्षण नकारात्मक असल्याचे समजते. (Lodha)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : सांगलीची उमेदवारी उबाठाला; तरीही विश्वजित कदम म्हणतात फेरविचार करा )

उबाठाला पराभूत करण्याची ताकद देवरांमध्ये

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेला (शिंदे) मिळावी, असा आग्रह भाजपाकडे धरला आहे. या मतदार संघातून देवरा हेच शिवसेना उबाठाला मागे खेचू शकतात, अशी खात्री असल्याने त्यांनी आपला हट्ट कायम ठेवला असल्याचे सांगण्यात येते. देवरा यांच्यासाठी दक्षिण मुंबई आणि दक्षिण मुंबई मतदारांसाठी देवरा नवे नाहीत, त्यामुळे शिवसेना उबाठाचे उमेदवार अरविंद सावंत यांना निवडणुकीत पराभूत करण्याची ताकद अनुभवी देवरा यांच्यात आहे. (Lodha)

राज्यसभेवर समाधानी

मिलिंद यांचे वडील मुरली देवरा यांनी या मतदार संघाचे चार वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केले असून तत्कालीन काँग्रेस उमेदवार मिलिंद हे २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. मिलिंद यांना मानणारा एक मोठा वर्ग दक्षिण मुंबईत असून त्यांना केंद्रीय मंत्रीपदाचाही अनुभव आहे. त्यामुळे देवरा हे प्रभावी उमेदवार असल्याचा विश्वास शिवसेनेला आहे. मात्र, देवरा हे राज्यसभेवर समाधानी असून लोकसभेसाठी ते फार इच्छुक नसल्याचे बोलले जाते. मागील दोन वेळा (२०१४ आणि २०१९) भाजपा-शिवसेना युतीकडून मोदी लाटेत त्यांना काँग्रेस उमेदवार म्हणून पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी पराभव झाल्यास ‘हॅट्रीक’चा शिक्का बसेल, अशी भीती त्यांना नाही, असे त्यांच्या जवळच्या एका कार्यकर्त्याने सांगितले. (Lodha)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.