भारतीय तटरक्षक दलाच्या ‘समुद्र पहरेदार’ या प्रदूषण नियंत्रण जहाजाने ब्रुनेईमध्ये मुआरा येथे मंगळवार, 10 एप्रिल रोजी थांबा घेतला. आसिआन देशांत सागरी तैनातीचा भाग म्हणून हा थांबा घेतला गेला. भारतीय तटरक्षक दलाच्या विशेष जहाजाने आसिआन देशाला भेट देण्याचा हा कार्यक्रम म्हणजे, सागरी प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 2022 मध्ये घोषित केलेल्या भारत-आसिआन उपक्रमाचा भाग आहे. कंबोडियामध्ये आसियान देशांच्या ‘संरक्षण मंत्री व इतर’ बैठकीत ही घोषणा झाली होती. (Indian Coast Guard)
(हेही वाचा – Mumbai Hawkers : बोरीवलीतील एस व्ही रोडसह आता स्कायवॉकही फेरीवाल्यांना आंदण, सांगा लोकांनी चालायचे कुठून?)
जहाजबांधणी क्षेत्रातील भारताची ताकद दिसणार
सदर तीन दिवसांच्या थांब्यात समुद्र पहरेदार (Samudra Prahari) या नौकेवरील कर्मचारीवृंद व्यावसायिक देवघेव करतील. सागरी प्रदूषण प्रतिसाद, सागरी शोध व बचाव, आणि सागरी कायद्याची अंमलबजावणी यावर याचा भर असेल. एकमेकांच्या डेकवर प्रशिक्षण, विषयतज्ज्ञांकडून ज्ञानाची देवाणघेवाण आणि ब्रुनेई सागरी संस्थांबरोबर क्रीडास्पर्धा आदी कार्यक्रम या वेळी घेतले जातील.
भारत आणि ब्रुनेईच्या तटरक्षक दलांच्या दरम्यान संबंध बळकट करण्याच्या उद्देशाने ही भेट महत्त्वाची ठरेल, शिवाय आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या संकल्पनांचे समर्थन करणारी जहाजबांधणी क्षेत्रातील भारताची ताकद दाखवून देण्यासाठीही ही भेट उपयुक्त ठरेल. तसेच, समुद्र पहरेदार वर स्वार झालेले राष्ट्रीय छात्र सेनेचे 25 छात्र तेथील स्थानिक तरुणांच्या सहयोगाने किनारा स्वच्छता कार्यक्रमात भाग घेतील. सरकारच्या ‘पुनीत सागर अभियानाचा’ हा भाग असेल.
(हेही पहा – Narendra Modi Ramtek : इंडि आघाडीवाले हिंदु धर्माच्या शक्तीलाही संपवू पहात आहेत; पंतप्रधानांनी उघड केली काँग्रेसची पापे )
सागरी सुरक्षेत वाढ करण्याचे भारताचे प्रयत्न
परकीय देशांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणाऱ्या देशांबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यास आणि द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यास भारतीय तटरक्षक दल वचनबद्ध आहे.
ही सागरी तैनात म्हणजे एकप्रकारे, त्या वचनबद्धतेचाच दाखला आहे. मुआरापूर्वी या जहाजाने व्हिएतनाम आणि फिलिपाईन्सला भेट दिली होती. आसियान क्षेत्रात धोरणात्मक सागरी संबंध सुरळीत राखण्यासाठी भारताचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेच हे द्योतक आहे.
सागरी प्रदूषणावर सर्वांनी मिळून उपाय करण्यासाठी भारताची कटिबद्धता, सागरी सहकार्य वाढवून सागरी सुरक्षेत वाढ करण्याचे भारताचे प्रयत्न, हे ‘सागर(SAGAR) – सर्व प्रदेशांत सुरक्षा आणि वृद्धी’ तसेच ‘पूर्वेकडे कृती (act east)’ आणि हिंद-प्रशांत दृष्टिकोन या धोरणांशी सुसंगत आहे. भारतीय तटरक्षक दलाचे समुद्र पहरेदार जहाज आसिआन क्षेत्रात तैनात होते, हे भारताच्या याच प्रयत्नांचे प्रतिबिंब म्हटले पाहिजे. (Indian Coast Guard)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community