मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंची (Sameer Wankhede) चौकशी करण्यासाठी एनसीबीने (NCB) मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. वानखेडेंना आतापर्यंत ८ समन्स बजावण्यात आले असुन एकदाही चौकशीसाठी हजर न राहिल्याने एनसीबीने हे पाऊल उचललं आहे. त्यांची चौकशी करणे गरजेचे असल्याचे यात सांगितले आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात वानखेडेंनी (Sameer Wankhede) २५ कोटींची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
(हेही वाचा – Char Dham Yatra : चारधाम यात्रेला जाणार असाल, तर ‘हे’ तुम्हाला माहीत हवेच, जाणून घ्या…)
उच्च न्यायालयाने समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या चौकशीची मान्यता दिल्यास चौकशी समितीची स्थापना होऊ शकते. बॅालिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्युनंतर अंमली पदार्थांचा मुद्दा चर्चेत आला होता. यानंतर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी बॅालिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन कारवाईचा धडाका सुरू केला होता. (Sameer Wankhede)
(हेही वाचा – Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलाच्या ‘समुद्र पहरेदार’ जहाजाचा ब्रुनेईमध्ये थांबा)
आर्यन खान याला (Aryan Khan) समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी कॅार्डिलिया क्रुझवर केलेल्या कारवाईत अटक केली होती. आर्यन खान (Aryan Khan) याच्याकडे ड्रग्ज सापडल्याचे सांगत एनसीबीने त्याला अटक केली होती. या प्रकरणामुळे आर्यन खान (Aryan Khan) बराच वेळ तुरुंगात होता. या प्रकरणातुन आर्यन खानला सोडवण्यासाठी वानखेडेंनी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Sameer Wankhede)
हे पहा –
Join Our WhatsApp Community