टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Tesla CEO Elon Musk) या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) भेटण्यासाठी भारताला भेट देणार आहेत. या भेटीत ते भारतात गुंतवणूक करण्याच्या आणि नवा कारखाना उघडण्याच्या त्यांच्या योजनांवर चर्चा करतील, असे वृत्त रॉयटर्सने प्रसिद्ध केले आहे. एलन मस्क 22 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात भारत दौऱ्यावर असतील. (Elon Musk in India)
(हेही वाचा – Varsha Gaikwad: काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफुस; वर्षा गायकवाड यांनी घेतली पत्रकार परिषद)
टेस्ला कार भारतात दाखल होण्याची शक्यता
एलन मस्क यांचा हा पहिलाच भारत दौरा (Elon Musk in India) असेल. एलन मस्क यांच्या भारत भेटीदरम्यान त्यांच्या गुंतवणुकीची योजना आणि भारतात इलेक्ट्रिक कार प्लांटची घोषणा करू शकतात, असं बोललं जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टेस्ला कार भारतात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय ग्राहकही टेस्ला कारची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात एलॉन मस्क यांनी भारत दौरा घोषित केल्यामुळे सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
गुंतवणूक आणि मॅन्युफॅक्चरींग प्लांटसंदर्भात चाचपणी
मस्क यांच्याकडून भारत दौऱ्याबाबत अधिकृत ट्वीट करण्यात आले आहे. एलन मस्क भारत दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटही घेणार असल्याची माहिती मिळत आहे. टेस्लाकडून गुंतवणूक आणि मॅन्युफॅक्चरींग प्लांटसंदर्भात चाचपणीसाठी एलन मस्क दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे. टेस्लाकडून महाराष्ट्र, गुजरात आणि तमिळनाडूत मॅन्युफॅक्चरिंग प्लांटच्या जागांसाठी चाचपणी केली जात आहे.
Looking forward to meeting with Prime Minister @NarendraModi in India!
— Elon Musk (@elonmusk) April 10, 2024
एलन मस्क नवी दिल्लीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात. यापूर्वीही मोदी आणि मस्क यांची गेल्या वर्षी जूनमध्ये भेट झाली होती, त्यात भारतातील इलेक्ट्रीक गाड्यांवरील आयात कर कमी व्हावा, अशी मागणी एलन मस्क यांनी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारकडून नवं ईव्ही धोरण राबवत आयात कर कमी करण्यात आला आहे, ज्याचा मोठा फायदा टेस्लाला होणार आहे.
रिलायन्ससोबत करार होणार ?
काही दिवसांपूर्वी टेस्ला भारतात व्यवसाय चालू करण्यासाठी स्थानिक भागीदाराच्या शोधात असल्याचे समोर आले होते. त्यानंतर टेस्ला रिलायन्ससोबत संयुक्त उपक्रम राबवत भारतात प्लांट उभारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Elon Musk in India)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community