Lok Sabha Election 2024 : आचारसंहितेच्या पार्श्वभुमीवर ६५ लाख रुपयांची रोकड आणि वाहन जप्त

Lok Sabha Election 2024 : आचारसंहिता काळात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जवळ बाळगता येत नाही. भरारी पथकांतर्फे विविध ठिकाणी जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

203
Lok Sabha Election 2024 : आचारसंहितेच्या पार्श्वभुमीवर ६५ लाख रुपयांची रोकड आणि वाहन जप्त
Lok Sabha Election 2024 : आचारसंहितेच्या पार्श्वभुमीवर ६५ लाख रुपयांची रोकड आणि वाहन जप्त

जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता (Acarsanhita) लागू करण्यात आली असून भरारी पथकाद्वारे आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलीस पथक आणि भरारी पथकांद्वारे दोन विविध घटनांमध्ये सुमारे ६५ लाखांची रोकड आणि एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- Ajit Pawar: पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भडकले अजितदादा; वाचा सविस्तर)

आचारसंहिता (Acarsanhita) काळात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जवळ बाळगता येत नाही. भरारी पथकांतर्फे विविध ठिकाणी जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. भोसरी एमआयडीसी (Bhosari MIDC) पोलिसांनी भोसरी एममआयडीसी पोलीस स्टेशन जवळील सी सर्कल जवळ ८ एप्रिल रोजी मध्यरात्री फॅन्सी नंबर प्लेट असलेली आणि संशयास्पदरितीने फिरणारी काळ्या रंगाची फॉरच्यूनर गाडी आढळून आली. पोलीसांनी अधिक तपास करून गाडीतून १३ लाख ९० हजाराच्या ५०० रुपयांच्या नोटा आणि ३० लाख रुपये किंमतीचे वाहनही पंचासमक्ष पंचनामा करुन जप्त केले आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- Bombay High Court : झाडांवर लाइटिंग गरजेची आहे का?; न्यायालयाचा सरकारला प्रश्न)

तर दुसऱ्या एका घटनेत १० एप्रिल रोजी दुपारी शिरुर (Shirur) पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना शिरुर नगर परिषद क्षेत्रातील कमान पूलाजवळ एका खाजगी वाहनातून ५१ लाख १६ हजाराची रक्कम नेली जात असल्याचे पाहणीत आढळून आले. याबाबत माहिती मिळताच भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी प्राप्तिकर विभागाला याबाबत माहिती दिली. सदर रक्कम कोषागारात ठेवण्यात आली असून प्राप्तिकर विभागाच्या चौकशीनंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.