महाविकास आघाडीचे जागावाटप (Varsha Gaikwad) निश्चित करताना मुंबईतील दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी आग्रही असलेल्या मुंबई काँग्रेसच्या (Congress) पदरी निराशा आल्याने वरिष्ठ नेत्यांविरोधात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. मिलिंद देवरा यांच्यासारखे नेते आधीच सत्ताधारी पक्षांमध्ये सहभागी झाले आहेत. त्यातच मुंबई काँग्रेस (Congress) अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी देखील जागावाटपावर नाराजी व्यक्त केली आहे.
(हेही वाचा – Ajit Pawar: पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भडकले अजितदादा; वाचा सविस्तर)
काय म्हणाल्या वर्षा गायकवाड
वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितले की, “मुंबईत जागा वाटपावर आम्ही नाराज आहोत. यामुळे पक्षश्रेष्ठींकडे माझे म्हणणे मी मांडले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी आमचे संघटन आहे. यामुळे मुंबईत पक्षाला प्रतिनिधीत्व मिळावे, ही अपेक्षा होती. मुंबईतील कोणत्या जागा हव्या होत्या, ते पक्षातील श्रेष्ठींना सांगितले होते. जो उमेदवार जिंकणार आहे, त्याला तिकीट द्यावे, ही अपेक्षा होती. मुंबईत काँग्रेस सोडून आमचे काही नेते गेले असले तरी पक्ष अजून मजबूत आहे. मुंबईत पक्षाचे वेगळे अस्तित्व आहे. तसेच पक्ष संघटनेत काम करताना कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात. महाविकास आघाडीसोबत जागा वाटपावर चर्चा करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने कठोर भूमिका घ्यायला हवी होती. या जागा वाटपाच्या वेळी मलाही विश्वासात घेतले गेले नाही. परंतु मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. पक्षाचे प्रोटोकॉल पाळणार आहे. आघाडी असताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, काही तडजोडी कराव्या लागतात.” असं वर्षा गायकवड (Varsha Gaikwad) यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचा –Bombay High Court : झाडांवर लाइटिंग गरजेची आहे का?; न्यायालयाचा सरकारला प्रश्न)
वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांचा फोनही बंद असल्याचं सांगितलं जातंय. वर्षा गायकवड दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांना उमेदवारी न देता दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाची जागा ही ठाकरे गटाला जाहीर करण्यात आली. ठाकरे गटाच्या वतीने अनिल देसाई यांना दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी आधीच जाहीर करण्यात आली आहे. (Varsha Gaikwad)
(हेही वाचा –S Jaishankar: नेहरूंमुळे भारत सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य बनला नाही, एस जयशंकर यांचा दावा)
काँग्रेसला नको असलेले मतदारसंघ वरिष्ठ नेत्यांनी पदरात पाडून घेतले, तर पक्षाला विजयाची खात्री असणारे मतदारसंघ मात्र सोडून देण्यात आले. विशेष म्हणजे मतदारसंघाचे वाटप करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासातच घेतले नसल्याचे समोर आले आहे. (Varsha Gaikwad)
हे पहा –
Join Our WhatsApp Community