Lok Sabha Election 2024: ऐकावं ते नवलचं! मतदानाआधीच दोघांनी केलं वोटिंग

258
Lok Sabha Election 2024: ऐकावं ते नवलचं! मतदानाआधीच दोघांनी केलं वोटिंग
Lok Sabha Election 2024: ऐकावं ते नवलचं! मतदानाआधीच दोघांनी केलं वोटिंग

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. देशातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्यासाठी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. याचेच एक उदाहरण गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातून समोर आलं आहे. वयाची ८५ पार केलेले मतदान केंद्रापर्यंत जाऊ न शकणारे वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना त्यांच्या घरी गृह मतदान करण्याची सोय निवडणूक आयोगाने या निवडणुकीत उपलब्ध करून दिली आहे. त्यातूनच महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याचे मतदान असलेल्या गडचिरोली लोकसभा (Lok Sabha Election 2024) मतदारसंघात आज गृह मतदान झाल आहे. (Gadchiroli)

(हेही वाचा –Mumbai Metro : आता मेट्रोने करता येणार चक्क विनातिकीट प्रवास !; काय आहे सुविधा ?)

गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात सिरोंचा येथील १०० वर्षे वय असलेले आणि 86 वर्षे वय असलेल्या दोन मतदारांसाठी शंभर किलोमीटरचा प्रवास करून मतदान पथक त्यांच्या घरी पोहोचलं आणि त्यांनी मतदान केलं. आजारी असल्याने खाटेवर पडून असलेले जास्त वय झालेले वयोवृद्ध नागरिक यांना मतदानाची इच्छा असतानाही ते करू शकत नाही. अशा या दोन मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करून लोकशाही व्यवस्थेत आपला सहभाग नोंदवला. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा –Elon Musk India : एलन मस्क येणार भारत दौऱ्यावर; पंतप्रधान मोदींची भेट घेणार)

ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंतची (Lok Sabha Election 2024) प्रत्येक निवडणूक ही लोकशाही व्यवस्थेत खूप महत्त्वाची असते. या निवडणुकीत १८वर्षापासून ते शंभर वर्षे वयोगटापर्यंतचे नागरिक मतदान करतात. मात्र, वयोवृद्ध झाल्यानंतर किंवा आजारी असले तर मनात इच्छा असूनही अनेकांना मतदान करता येत नाही. मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावणे मोठं कठीण काम या मतदारांसाठी असते. गडचिरोली चिमूर हा लोकसभा मतदारसंघ (Lok Sabha Election 2024) भौगोलिक दृष्ट्या सर्वाधिक लांबवर पसरलेला मतदार संघ आहे. या मतदारसंघात जिल्हा प्रशासनाने जिल्हा निवडणूक अधिकारी असलेले गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाच्या या नव्या धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. सिरोंच तालुका राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेला तालुका आहे. या तालुक्यातून दोन वयोवृद्ध मतदारांसाठी गृह मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Lok Sabha Election 2024)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.