Mahatma Jyotiba Phule : महिलांना आधुनिक शिक्षण मिळवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले

145
Mahatma Jyotiba Phule : महिलांना आधुनिक शिक्षण मिळवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले
Mahatma Jyotiba Phule : महिलांना आधुनिक शिक्षण मिळवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले

ज्योतिराव फुले हे भारतीय समाज सुधारक, समाजसेवी आणि लेखक होते. १८७३ साली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ज्योतिराव फुले (Mahatma Jyotiba Phule) आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांनी मागासवर्गीय लोकांना आणि महिलांना आधुनिक शिक्षण मिळवून देण्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवले.

ज्योतिराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली पुण्यात झाला. ज्योतिराव वर्षभराचे असतानाच त्यांची आई देवाघरी गेली. त्यांना त्यांच्या बहिणीने वाढवलं. खूप वर्षांपूर्वी त्यांचं कुटुंब साताऱ्याहून पुण्यात आलं होतं. पुण्यात येऊन ते बागकाम करू लागले. त्याकाळी बागकाम करणाऱ्यांना फुले म्हणून संबोधले जायचे. त्यांच्या कुटुंबाच्या कामावरून त्यांचं आडनाव फुले असं पडलं.

(हेही वाचा – Varsha Gaikwad: काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफुस; वर्षा गायकवाड यांनी घेतली पत्रकार परिषद)

स्त्रियांना दिला शिक्षणाचा अधिकार

ते जातीभेदाच्या विरोधात होते. सर्व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, त्यांनी बालविवाहाला विरोध केला आणि विधवाविवाहाला समर्थन दिले. समाजातून अनिष्ट चालीरिती, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा निघून जाऊन समाज जागृत आणि सुशिक्षित व्हावा, यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांत त्यांच्या पत्नी त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या होत्या.

पुण्यामध्ये सुरू केली मुलींसाठी शाळा

१९ व्या शतकात महिलांना आधुनिक शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली होते. त्यांच्या हालअपेष्टा ज्योतिरावांना पहावल्या नाहीत. त्यांनी सर्वात आधी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवायला सुरुवात केली. कालांतराने त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. सावित्रीबाई चांगल्या प्रकारे लिहायला आणि वाचायला शिकल्याही. पुढे ज्योतिराव फुले यांनी पुण्यामध्ये ब्राह्मण भिडे यांच्या मदतीने मुलींसाठी शाळा सुरू केली.

ज्योतिरावांनी (Mahatma Jyotiba Phule) सुरुवातीला मराठी भाषेतून शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी पुढे वयाच्या एकविसाव्या वर्षी इंग्रजीतून इयत्ता सातवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. १८४० साली ज्योतिरावांचं लग्न सवित्रीबाईंशी झालं. या दाम्पत्याने आयुष्यभर सामाजिक जागृती आणि प्रगती व्हावी यासाठी अखंड प्रयत्न केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.