- ऋजुता लुकतुके
एम्पिअर ‘नेक्स बिग थिंग’ (Ampere NXG) इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँचसाठी सज्जझाली आहे. विशेष म्हणजे कंपनीने ती अधिकृतपणे लाँच करण्यापूर्वी एक वेगळाच प्रयोग भारतात केला होता. त्यांनी गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात ऑटोएक्स्पोमध्ये या स्कूटरची झलक पहिल्यांदा भारतीयांना दाखवली. त्यानंतर सुरू केला या स्कूटरचा काश्मीर ते कन्याकुमारीचा प्रवास. ग्रीव्ह्ज मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ही स्कूटर आहे. (Ampere NXG)
(हेही वाचा- Mahatma Jyotiba Phule : महिलांना आधुनिक शिक्षण मिळवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले)
मागच्या वर्षभरात ती भारतात ५,१०० पेक्षा जास्त किलोमीटर फिरली आहे. त्यातून या स्कूटरची चाचणीही होतेय. ज्या वेगवेगळ्या शहरं आणि गावांमधून ती फिरते तिथे तिची चर्चाही होतेय. ‘आम्ही हा प्रवास मुद्दाम करतोय. प्रवासात स्कूटरला वेगवेगळे अडथळे पार करता येतील. तिची परीक्षा होईल. भारतातील वेगवेगळी संस्कृती, आधुनिकता आणि टिकून राहण्याची लोकांची धडपड या गुणांशी तिची ओळख होईल,’ असं कंपनीचे सीईओ संजय बेहल यांनी प्रवासाला सुरुवात करताना म्हटलं होतं. (Ampere NXG)
आता हा प्रवास पूर्ण होऊन सगळ्या प्रकारच्या रस्त्यांवर ती टिकू शकते असा विश्वास कंपनीला आलाय. (Ampere NXG)
Greaves Cotten Showcased #Ampere NXG Electric Scooter at #AutoExpo2023.@ampere_ev @AEMotorShow @GreavesCottonIN #AutoExpo pic.twitter.com/REljbD17x1
— Electric Vehicle Info (@evehicleinfo) January 11, 2023
दोन चाकांवर फिरणारी दुनिया असं कंपनीने या स्कूटरचं वर्णन केलं आहे. इलेक्ट्रिक वाहन असलं तरी त्यात बरेच नवीन बदल करण्यात आले आहेत. टिकाऊपणा हा स्कूटरचा सगळ्यात मोठा गुण असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. स्कूटर ग्राहकाला स्टाईल आणि वेग देते. तसंच वापरलेलं सॉफ्टवेअरही अत्याधुनिक आणि मोबाईल तसंच इतर माध्यमांना त्वरित जोडलं जाणारं आहे. याचा फायदा प्रवास सोपा होण्यातच मिळणार आहे. (Ampere NXG)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : महायुतीचा पेच कायम ८ जागांवर अजूनही निर्णय नाही)
गाडीतील बॅटरी ही सुरक्षित आणि अत्याधुनिक डिझाईन असलेली आहे. बूट होण्यासाठी लागणारा वेळही कमी आणि ऑपरेटिंग सिस्टिम वेगवान आहे. विशेष म्हणजे फक्त ४९९ रुपये भरून तुम्ही या स्कूटरचं आगाऊ बुकिंग करू शकणार आहात. साधारण १,३०,००० रुपयांपासून या स्कूटरची किंमत सुरू होईल असा अंदाज आहे. (Ampere NXG)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community