Neelkanth Mandir : नीलकंठ महादेव मंदिराची संपूर्ण माहिती; होईल महादेवाची कृपा!

नीलकंठ महादेव मंदिराचे नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. या अतिशय सुंदर मंदिराच्या शिखराच्या पायथ्याशी समुद्रमंथनाचे दृश्य चित्रित करण्यात आले असून गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या एका विशाल पेंटिंगमध्ये भगवान शिव विष प्राशन करताना दाखवण्यात आले आहेत.

238
Neelkanth Mandir : नीलकंठ महादेव मंदिराची संपूर्ण माहिती; होईल महादेवाची कृपा!

नीलकंठ महादेव मंदिर (Neelkanth Mandir) हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील पौरी गढवाल जिल्ह्यात स्थित एक अत्यंत महत्वाचे हिंदू मंदिर आहे. मंदिराचे आध्यात्मिक तेज लोकांच्या हृदयात भक्तीभाव निर्माण करते. हे मंदिर ऋषिकेश शहरापासून ३२ किलोमीटर अंतरावर हिमालयाच्या नयनरम्य जंगलांमध्ये आहे. हे मंदिर समुद्रसपाटीपासून अंदाजे १,३३० मीटर (४,३६० फूट) उंचीवर आहे. (Neelkanth Mandir)

नीलकंठ मंदिर (Neelkanth Mandir) मधुमती आणि पंकजा नद्यांनी वेढलेले आहे. मंदिर परिसराला नैसर्गिक झराही लाभला आहे जेथे भाविक पवित्र स्नान करतात. मंदिराच्या मुख्य मंदिरात एक शिवलिंग आहे. येथे येणारे भाविक नारळ, फुले, दूध, मध, फळे आणि जल महादेवाला अर्पण करतात. नीलकंठ मंदिर हे हिंदू धर्मातील एक अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. असे म्हटले जाते की नीलकंठ मंदिर हे भक्तांना एक अद्भुत अनुभव देणारे पवित्र स्थान आहे. (Neelkanth Mandir)

ऋषिकेशपासून या मंदिरापर्यंत जाण्यासाठी तुम्ही ट्रेक करू शकता आणि आजूबाजूच्या परिसरातील आकर्षक दृश्यांचा आनंद घेऊ शकता. नीलकंठ महादेव मंदिराचे नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. या अतिशय सुंदर मंदिराच्या शिखराच्या पायथ्याशी समुद्रमंथनाचे दृश्य चित्रित करण्यात आले असून गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या एका विशाल पेंटिंगमध्ये भगवान शिव विष प्राशन करताना दाखवण्यात आले आहेत. समोरच्या टेकडीवर शिवपत्नी पार्वती यांचेही मंदिर आहे. (Neelkanth Mandir)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : महायुतीचा पेच कायम ८ जागांवर अजूनही निर्णय नाही)

नीलकंठ मंदिराचा इतिहास काय आहे?

समुद्रमंथनातून निघालेले विष भगवान शिवाने याच ठिकाणी प्राशन केले होते. त्याचवेळी त्यांच्या पोटात विष पोहोचू नये म्हणून पत्नी माता पार्वतीने त्यांचा गळा दाबला होता. अशाप्रकारे, विष त्यांच्या घशातच राहिले. विष प्राशन केल्यानंतर त्यांचा गळा विषाच्या प्रभावाने निळा पडला होता. त्यांचा गळा निळा पडल्याने त्यांना नीलकंठ (Neelkanth) या नावाने ओळखले जाते. (Neelkanth Mandir)

नीळकंठ मंदिरात दरवर्षी शिवरात्री आणि श्रावणात मेळ्यांचे आयोजन केले जाते. या काळात हजारो भाविक या मंदिराला भेट देतात. तसेच पर्यटकही मंदिरात दर्शनासाठी येतात. या मंदिरात तुम्ही कधीही जाऊ शकता. मात्र भगवान शिवाजी अतिरिक्त कृपा मिळवायची असेल तर शिवरात्रीला या मंदिराला भेट द्या. तेव्हा इथे भक्तिचा महापूर आलेला असतो. (Neelkanth Mandir)

नीलकंठ महादेव मंदिरात दर्शन केव्हा घ्याल?

सोमवार ते शनिवार : सकाळी ५ ते संध्याकाळी ७ पर्यंत
रविवार : सकाळी ५ ते दुपारी १२ पर्यंत (Neelkanth Mandir)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.