Realme GT Neo 6 SE : रिअलमी कंपनीचा नवीन परवडणारा फोन लाँच 

आधुनिक फिचर्स पण, कमी किंमत यासाठी रिअलमीची निओ सीरिज प्रसिद्ध आहे

240
Realme GT Neo 6 SE : रिअलमी कंपनीचा नवीन परवडणारा फोन लाँच 
Realme GT Neo 6 SE : रिअलमी कंपनीचा नवीन परवडणारा फोन लाँच 
  • ऋजुता लुकतुके

रिअलमी कंपनीने आपल्या निओ सीरिजमधील मध्यम श्रेणीतील जीटी निओ ६ एसई हा नवीन फोन भारतात लाँच करण्याची तयारी चालवली आहे. ६.७८ इंचांचा डिस्प्ले, आणि एमोल्ड स्ट्रीन असलेला हा फोन आधुनिक फिचर्स पण, त्या मानाने स्वस्त असा आहे. डिस्प्लेची प्रखरता आणि स्पष्टता ६,००० नीट्स इतकी आहे. शिवाय गोरिला ग्लासची सुरक्षा फोनच्या स्क्रीनला आहे. आणि फोनचा प्रोसेसर स्नॅपड्रॅगन ७ च्या तिसऱ्या पिढीचा आहे. सिल्व्हर नाईट आणि कँजी हॅकर या दोन रंगांत हा फोन उपलब्ध आहे. (Realme GT Neo 6 SE)

(हेही वाचा- Ampere NXG : एम्पिअर ‘नेक्स बिग थिंग’ इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँचसाठी सज्ज)

स्क्रीनच्या चौकटीसाठी नॅनो मिरर तंत्रज्जान वापरून ही चौकट टिटॅनिअमसारखी दिसेल याची काळजी कंपनीने घेतली आहे. आणि त्यामुळेच फोनची किंमत कमी करण्यात त्यांना यश आलं आहे. (Realme GT Neo 6 SE)

फोनच्या कॅमेरा श्रेणीत कुठलीही तडजोड नाही. प्राथमिक कॅमेरा ५० मेगा पिक्सेलचा आहे. त्याला आयएमएक्स सेन्सर बसवण्यात आलाय. तर अल्ट्रा-वाईड कॅमेरा ८ मेगा पिक्सेलचा आणि फ्रंट कॅमेरा ३२ मेगा पिक्सलचा आहे. फोनची बॅटरीही ५,५०० एमएएच इतक्या क्षमतेची आहे. १२ मिनिटांत निम्मी बॅटरी चार्ज होईल या क्षमतेचा फास्ट चार्जर किटमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. ८, १२ आणि १६ जीबी रॅम तसंच २५६ आणि ५१२ जीबी स्टोरेजमध्ये हा फोन उपलब्ध आहे. (Realme GT Neo 6 SE)

(हेही वाचा- Neelkanth Mandir : नीलकंठ महादेव मंदिराची संपूर्ण माहिती; होईल महादेवाची कृपा!)

सध्या या फोनचं बुकिंग भारतात सुरू झालं आहे. आणि प्राथमिक मॉडेलची किंमत २०,७३० रुपयांपासून सुरू होते. तर सर्वात वरचं मॉडेल हे ३०,००० रुपयांना उपलब्ध आहे. (Realme GT Neo 6 SE)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.