लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) प्रचार जसजसा रंगात येत आहे आम आदमी पक्षाचे पितळ तसतसे उघडे पडत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील दलित चेहरा राजकुमार आनंद यांनी स्पृश्य-अस्पृश्यामध्ये भेद करण्याचा आरोप करीत आनंद यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा खरा चेहरा आता जनतेपुढे येत आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा दावा करणारे केजरीवाल यांचे सरकार दलितांसोबत भेदभावयुक्त व्यवहार करीत असल्याचा आरोप त्यांचेच मंत्री राजकुमार आनंद यांनी केला आहे. (Arvind Kejriwal)
राजकुमार आनंद हे ‘आप’ सरकारमधील दलित वर्गाचा चेहरा म्हणून ओळखले जातात. राजकुमार आनंद यांनी आम आदमी पक्षाचा (AAP) मंत्रिपद आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ‘आप’वर दलित शोषित वर्गाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. आनंद यांनी या विषयाला घेवून आम आदमी पार्टीवरही अनेक गंभीर आरोप केले आहेत. केजरीवाल यांच्या मनात दलितांप्रती प्रेम आणि आदर असता तर दिल्ली किंवा पंजाबमधून किमान एका तरी दलित नेत्याला राज्यसभेचे सदस्य बनविले असते. परंतु, केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे दलितांवरील प्रेम हे पुतना मावशीचे आहे. दलितांना राज्यसभा तर सोडाच पक्ष संघटनेतसुध्दा पद दिले जात नाही, असा आरोप आनंद यांनी केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केंजरीवाल (Arvind Kejriwal) आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया मद्य घोटाळा प्रकरणी सध्या तुरूंगात आहेत. त्यांच्यावर पीएमएलए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सध्या आपपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अरविंद केजरीवाल किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही सदस्याने भ्रष्टाचार केलेला नाही, ही बाब लोकांना पटवून सांगण्यासाठी आम आदमी पक्षाचे नेते सध्या धडपड करीत आहेत. (Arvind Kejriwal)
आपसाठी समस्या उद्भवली
पण त्याचवेळी केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या सरकारमधील एका मंत्र्याने पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. यामुळे आपचे खूप मोठे नुकसान होण्याची शकयता आहे. आनंद यांनी मद्य घोटाळा प्रकरणावरही आपले मत व्यक्त केल्यामुळे आम आदमी पक्षाचा (AAP) खरा चेहरा जनतेपुढे आला आहे. (Arvind Kejriwal)
राजकुमार यांची समाजावर मजबूत पकड आहे
राजकुमार आनंद (Rajkumar Anand) यांनी मंत्रीपद आणि आमदारकीचा राजीनामा देण्यामागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचा आरोप आपकडून केला जात आहे. मात्र, राजकुमार आनंद यांनी स्वत:च केजरीवाल यांचा खरा चेहरा जगापुढे आणल्यामुळे आपच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. राजकुमार आनंद हे जाटव समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. दिल्लीसह पटेल नगरात पसरलेल्या जाटव समाजावर त्यांची मजबूत पकड आहे. (Arvind Kejriwal)
(हेही वाचा – Ampere NXG : एम्पिअर ‘नेक्स बिग थिंग’ इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँचसाठी सज्ज)
पटेल नगरमधून विजयी
राजकुमार आनंद (Rajkumar Anand) यांना २०२० मध्ये झालेल्या पटेलनगर विधानसभा निवडणुकीत ६१ टक्के मते मिळाली होती. जाटव समाजातील असल्याने राजेंद्र पाल गौतम मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांना संधी मिळाली. जाटव समाजातील राजेंद्र पाल गौतम यांना मंत्रीपदावरून हटवल्यानंतर त्याच समाजातील कुणाला तरी मंत्री करावे, अशी आपची इच्छा होती. (Arvind Kejriwal)
आपच्या व्होट बँकेवर परिणाम होऊ शकतो
राजेंद्र पाल गौतम यांच्या राजीनाम्यानंतर राजकुमार आनंद (Rajkumar Anand) यांचे नाव आघाडीवर आले आणि त्यांना मंत्री बनविण्यात आले. परंतु, लोकसभा निवडणुकीपूर्वी आनंद यांनी राजीनामा दिल्याने निवडणुकीत आपच्या व्होट बँकेवर परिणाम होऊ शकतो. राजकुमार अलीगढचे आहेत. २०११ मध्ये ते इंडिया अगेन्स्ट करप्शन चळवळीचे सक्रिय सदस्य होते. (Arvind Kejriwal)
आपकडे हे आव्हान आहे
आनंद यांच्या राजीनाम्यानंतर आम आदमी पक्षाला एकसंध ठेवण्याचे आव्हानही वाढले आहे. कारण अनेकांनी आपले राजकीय भविष्य उज्ज्वल करण्यासाठी १२ वर्षांपूर्वी आम आदमी पक्षाची (AAP) कास धरली होती. मात्र पक्षाचे तीन ज्येष्ठ नेते तुरुंगात गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकामागून एक धक्के बसत गेले. मात्र आता एका मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने पक्षात सर्व काही सुरळीत होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Arvind Kejriwal)
महत्वाचे म्हणजे, राजकुमार आनंद (Rajkumar Anand) यांच्या मनात काय सुरू आहे? याची साधी भनक सुध्दा कुणाला लागली नव्हती. ते बुधवारी दिल्ली सचिवालयातील त्यांच्या कार्यालयात गेले. त्यानंतर ते तेथून निघून गेले आणि त्यांनी मंत्रीपद आणि पक्ष सोडण्याची घोषणा केली. मात्र, आम आदमी पक्ष आनंद यांच्या आरोपांवर विश्वास ठेवत नाही. आपला पक्ष खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गावर चालत असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. इतर पक्ष फक्त बाबासाहेबांचा फोटो लावत आहेत. पूर्व दिल्ली लोकसभा जागा सर्वसाधारण झाल्यानंतरही या जागेवर वाल्मिकी समाजातील कुलदीप कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे, असा दावा आपने केला आहे. (Arvind Kejriwal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community