- ऋजुता लुकतुके
यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) मोठ्या धावसंख्येचा पाठलाग शक्य होतोय हे आपण काही सामन्यांमध्ये पाहिलं. सामनेही रंगतदार होऊ लागले आहेत. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स दरम्यानचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. विजयासाठी २ धावा हव्या असताना तळाच्या राशिद खानने चौकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. या हंगामातील राजस्थान रॉयल्सचा हा पहिलाच पराभव. (IPL 2024 GT vs RR)
जयपूरमध्ये झालेल्या या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आणि सामना एक तास उशिरा सुरू करावा लागला. पण, त्यानंतर खेळपट्टीमध्ये संथपणा अजिबात आला नाही. उलट संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी तिसऱ्या गड्यासाठी १३० धावांची भागिदारी रचत संघाला १९० चा टप्पा ओलांडून दिला. सॅमसनने ३८ चेंडूंत ६८ तर परागने ४८ चेंडूंत ७६ धावा केल्या. यात पराग थोडा जास्त आक्रमक. त्यामुळे त्याने ५ षटकारांची आतषबाजी केली. राजस्थानने गुजरातसमोर विजयासाठी १९६ घावांचं आव्हान ठेवलं. (IPL 2024 GT vs RR)
𝘾𝙧𝙞𝙨𝙞𝙨 𝙈𝙖𝙣 delivered yet again 😎
🎥 Relive the thrilling end to a thrilling @gujarat_titans win!
Recap the match on @starsportsindia & @Jiocinema 💻 📱#TATAIPL | #RRvGT pic.twitter.com/eXDDvpToZ0
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2024
(हेही वाचा – Realme GT Neo 6 SE : रिअलमी कंपनीचा नवीन परवडणारा फोन लाँच)
राशिद खान आणि राहुल टेवाटियाने लढवला किल्ला
याला उत्तर देताना गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने साई सुदर्शनच्या साथीने जोरदार सुरुवात केली होती आणि संघाने ९ षटकांत ६४ धावांची सलामीही दिली. सुदर्शन ३४ धावांवर बाद झाल्यावर शुभमनने आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली होती. पण, दुसऱ्या बाजूने विकेट जात राहिल्या. १ बाद ६४ वरून संघाची धावसंख्या ६ बाद १५७ झाली आणि विजयासाठी अजून ४९ धावा हव्या होत्या. अशावेळी राशिद खान आणि राहुल टेवाटियाने किल्ला लढवला. टेवाटियाने ११ चेंडूंत २२ आणि राशिदने ११ चेंडूंत २३ धावा केल्या. (IPL 2024 GT vs RR)
शेवटच्या षटकांत गुजरातला विजयासाठी सहा चेंडूंत १५ धावांची आवश्यकता होती. त्यातच जलद धाव घेण्याच्या प्रयत्नांत राहुल टेवाटिया धावचीतही झाला. पण, राशिदने नियंत्रण सुटू दिलं नाही. आणि षटकांत ३ चौकार वसूल करत गुजरातला रोमहर्षक विजय मिळवून दिला. रशिद खानने २४ धावांबरोबरच १८ धावा देत एक बळीही मिळवला होता. त्यामुळे अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीरीचा पुरस्कार देण्यात आला. (IPL 2024 GT vs RR)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community