- ऋजुता लुकतुके
२०१७ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी (ODI World Cup 2027) दक्षिण आफ्रिकेतील ८ ठिकाणं आणि क्रिकेट मैदानं निश्चित करण्यात आली आहेत. न्यूज२४ वाहिनीने याविषयीची बातमी दिली आहे. या स्टेडिअममध्ये किंग्जमेड, वाँडरर्स, न्यूलँड्स या आफ्रिकेतील प्रसिद्ध मैदानांचाही अर्थातच समावेश आहे. २०१७ च्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका, झिंबाब्वे आणि नामिबिया इथं होणार आहे. (ODI World Cup 2027)
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे सीईओ फोलेटस्की मोसेकी यांनी ही मैदानं निवडताना शास्त्रीय दृष्टिकोन ठेवल्याचं सांगितलं. ‘शहरातील हॉटेलची संख्या आणि विमानतळ जवळ असणं यासारखे निकष वापरून आम्ही स्पर्धेची ठिकाणं निश्चित केली आहेत. त्यामुळे आयोजनाची संधी ज्या शहरांना मिळणार नाही, त्यांना वाईट नक्की वाटेल. पण, स्पर्धेच्या हितासाठी हा निर्णय आवश्यक असेल,’ असं मोसेकी न्यूज२४ वेबसाईटशी बोलताना म्हणाले. (ODI World Cup 2027)
(हेही वाचा – Ajit Agarkar on Virat Kohli : निवड समिती प्रमुख अजित आगरकर विराटच्या तंदुरुस्तीवर काय म्हणाला?)
ही आठ ठिकाणं सध्या निश्चित
वाँडरर्स, सेंच्युरिअन पार्क, किंग्डमेड, गेबेरा, बोलंड पार्क, न्यूलँड्स बफेलो पार्क आणि ब्लुमफाऊंटन ही आठ ठिकाणं सध्या निश्चित आहेत. पण, नेमके कुठले आणि किती सामने कुठे होणार, तसंच बाद फेरी आणि अंतिम फेरी कुठे होणार हे अजून निश्चित झालेलं नाही. यजमान देश म्हणून दक्षिण आफ्रिका आणि झिंबाब्वे संघांना स्पर्धेत प्रवेश मिळाला आहे. तर नामिबियाला आफ्रिका खंडातील पात्रता फेरीतून जावं लागणार आहे. (ODI World Cup 2027)
नामिबियाप्रमाणेच आणखी ३ संघ हे पात्रता फेरीतून येतील. प्रत्येकी ७ संघांचे दोन गट पाडण्यात येतील आणि या साखळी लढतीतून गटातील ३ अव्वल संघ दुसऱ्या फेरीत पोहोचतील. सुपरसिक्स लढतींनंतर उपांत्य फेरीचे ४ संघ ठरतील. २००३ च्या विश्वचषकाप्रमाणेच हा फॉरमॅट असेल. प्रत्येक संघ साखळीत एकेकदा दुसऱ्या संघांशी भिडेल. (ODI World Cup 2027)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community