महाराष्ट्रात तीन नकली पक्ष एकत्र आले आहेत. नकली उद्धव सेना, शरद पवार आणि उरलेली काँग्रेस असे तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती आहे. या तिघांची ऑटो आहे, मात्र यांचे काही खरे नाही. शरद पवार हे दहा वर्षे केंद्रात मंत्री होते, पण त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केले याचा हिशेब द्यावा, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) म्हणाले.
काय म्हणाले अमित शाह?
वातावरण बिघडले आहे असे काँग्रेसवाल्यांना वाटते, मात्र नांदेडमध्ये भाजपाचेचे वातावरण आहे. ही निवडणूक मोदींना पंत्रप्रधान करण्याची आहे. प्रतापराव यांना मत म्हणजे मोदींना मत. मनमोहन सिंग यांनी आपली अर्थव्यवस्था 11 व्या नंबरला सोडून गेले होते ती आज पाचव्या स्थानावर आली आहे. खर्गे म्हणतात काश्मीरचा अन् महाराष्ट्राचा काय संबंध? पण काश्मीर हे पूर्ण देशाचा आहे, याच्या सुरक्षेसाठी नांदेडचा तरूण तयार आहे. काँग्रेसने 70 वर्षात 370 कलम हटवले नाही. दहा वर्ष मनमोहन सोनिया यांनी सरकार चालवले, तेव्हा बाहेरून लोक यायचे अन् इथे घातपात करायचे. मोदींच्या काळात पुलवामा हल्ला झाला, मात्र मोदींनी त्यांच्या घरात्त घुसून त्यांना मारले. जगाला मोदींनी मोठा संदेश दिला आहे, आमच्या वाटेला जर कुणी आला तर आम्ही त्याला सोडणार नाही, असे अमित शहा (Amit Shah) म्हणाले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मोदींच इंजिन अन् आपली विकासाची गाडी आहे. दुसरीकडे गाडी आहे पण राहुल गांधींचं बंद पडलेलं इंजिन त्याला जोडलेलं आहे. सगळेच म्हणतात मी इंजिन आहे, पण इंजिनमध्ये एकाच ड्रायव्हरची जागा असते. ती गाडी आपल्याला विकासाकडे घेऊन जात नाही. आपली मोदींची गाडी हीच विकासाची गाडी आहे, असेही अमित शहा (Amit Shah) म्हणाले.
Join Our WhatsApp Community