Carnac Bunder Bridge : कर्नाक बंदर पुलाचा खर्च वाढला; ४६ टक्क्यांहुन अधिक वाढ

पुल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मंजूर केलेली रक्कम ही केवळ रेल्वे हद्दीतील पुलाकरताच खर्च होणार आहे. त्यामुळे या पुलाच्या पोहोच रस्त्यांच्या पुनर्बांधकामाकरता नव्याने निविदा मागवून कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे.

875
Carnac Bunder Bridge : कर्नाक बंदर पुलाचा खर्च वाढला; ४६ टक्क्यांहुन अधिक वाढ

मुंबई महापालिकेच्यावतीने कर्नाक बंदर पुलाच्या (Carnac Bunder Bridge) पुनर्बांधणीचे काम सध्या सुरु असून या पुलाच्या बांधकामांच्या खर्चात अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या पुलाच्या पोहोच रस्त्यांचे पुनर्बांधकामासाठी नव्याने निविदा मागवण्यात आल्या आहे. या पोहोच रस्त्यांच्या बांधकामासाठी तब्बल ५५ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. (Carnac Bunder Bridge)

शहरातील मस्जिद बंदर येथील लोकमान्य टिळक मार्ग येथील कर्नाक पूल (Carnac Bunder Bridge) धोकादायक ठरल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने पाडल्यानंतर महापालिकेच्यावतीने पुलाचे बांधकाम आणि त्याचा पोहोच रस्त्याचा भाग पाडून त्याचे पुनर्बांधकाम करण्यासाठी महापालिकेने सन २०१६मध्ये कंत्राटदाराची नेमणूक केली. त्यानुसार कामाला सुरुवात झालेली असून या पुलाचा आराखडा व संरचनात्मक बांधकाम याकरता भारतीय रेल्वेची संशोधन डिझाईन आणि मानक संस्था अर्थात आरडीएसओ, इंडियन रोड काँग्रेस नुसार झालेल्या विविध सुधारणा व बदलांमुळे मंजूर केलेल्या कंत्राट कामांच्या किंमतीत ४६ टक्क्यांहुन अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. (Carnac Bunder Bridge)

(हेही वाचा – पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये लोकशाहीविरोधी प्रचार; निवडणुकीत NOTA निवडण्याचे आवाहन)

पुल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मंजूर केलेली रक्कम ही केवळ रेल्वे हद्दीतील पुलाकरताच खर्च होणार आहे. त्यामुळे या पुलाच्या पोहोच रस्त्यांच्या पुनर्बांधकामाकरता नव्याने निविदा मागवून कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या कामांसाठी विविध करांसह ५५.८६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी कामांसाठी महापालिकेच्यावतीने बुकॉन इंजिनिअर्स एँड इन्फारस्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. या पुलाच्या बांधकामासाठी यापूर्वी सुमारे ५३ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली होती, परंतु या खर्चात पुलाच्या पोहोच मार्गाचे काम होणार नसल्याने यासाठी आता आणखी सुमारे ५५ कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. (Carnac Bunder Bridge)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.