- ऋजुता लुकतुके
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीची बॅट फारशी तळपली नाही आणि जसप्रीत बुमराच्या एका अप्रतिम चेंडूवर ३ धावांत तो बाद झाला. पण, या सामन्याच्या निमित्ताने विराट कोहली मागचे तीन दिवस मुंबईत होता. आणि या दरम्यान पत्रकारांशी त्याने मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. यात तो आपल्याला कशाची भीती वाटते आणि डाएट तो कसं पाळतो याविषयी बोलताना दिसतो. (IPL 2024 Virat Kohli)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेच हे पॉडकास्ट प्रसिद्ध केलं आहे आणि यात विराटने आपली भीती उघड केली आहे. ‘विमान प्रवासात मला खूप भीती वाटते आणि खासकरून छोटं जरी वादळ आलं आणि विमान हललं तर आपल्याला भीती वाटते,’ असं विराट यात म्हणतो. विमान प्रवासात विराट सीट पकडूनच बसतो, असंही त्याने सांगितलं आहे. या हंगामात कोहली चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. आणि ६ सामन्यांत आतापर्यंत त्याने ३१९ धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपही त्याच्याकडेच आहे. (IPL 2024 Virat Kohli)
Plans in motion. ☝ game at a time. 👊#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 pic.twitter.com/0CDXQYHMHO
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 10, 2024
कोहली फॉर्ममध्ये असला तरी आपल्या संघाला तो विजय मिळवून देऊ शकलेला नाही. आयपीएलमधील ६ सामन्यांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत फक्त १ सामनाच जिंकला आहे. दरम्यान आणखी एका व्हिडिओत विराटने आपल्या तंदुरुस्तीचं गमक उघड करून सांगितलं आहे. आपली तंदुरुस्ती व्यायामाबरोबरच आहारामुळे टिकून आहे असं विराटला वाटतं. (IPL 2024 Virat Kohli)
“Fitness is Food” – @ImVKohli knows and believes in eating the right food and training well to get the best physique for elevating your game! 💪🏼💯
Can we expect another ton to come our way from the fitness KING, in today’s epic #IPLRivalryWeek battle of RO-KO? 👀
Catch him in… pic.twitter.com/hATU3IhROQ
— Star Sports (@StarSportsIndia) April 11, 2024
‘मी व्यायाम आणि सरावाबरोबरच आहारावर लक्ष देतो. मी एकच गोष्ट दिवसातून तीनदा आणि सलग सहा महिने खाऊ शकतो. मला त्याने फरक पडत नाही. आणि त्यामुळेच मी तंदुरुस्त राहतो,’ असं विराटने या व्हिडिओत बोलून दाखवलं आहे. एखादी गोष्ट खावीशी वाटणं किंवा नकोशी वाटणं हे मनाशी जोडलेलं आहे, असंही विराट कोहलीला वाटतं. (IPL 2024 Virat Kohli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community