Cyber Crime : ‘व्हाईसक्लोनिंग’ आणि ‘डीपफेक’ सायबर क्राईमचे नवीन शस्त्र

240
Cyber Crime : 'व्हाईसक्लोनिंग' आणि 'डीपफेक' सायबर क्राईमचे नवीन शस्त्र
Cyber Crime : 'व्हाईसक्लोनिंग' आणि 'डीपफेक' सायबर क्राईमचे नवीन शस्त्र
‘व्हॉइस क्लोन’ (Voice Clone) आणि ‘डीपफेक’ (Deepfake) हे सायबर घोटाळेबाजासाठी नवीनतम साधन म्हणून उदयास आले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता ( एआय) शी संबंधित या सायबर स्कॅमचे (Cyber Crime) जाळे मोठ्या प्रमाणात वाढले आहे.तज्ञाच्या म्हणण्यानुसार व्हॉईस क्लोन तयार करण्यासाठी केवळ तीन सेकंदांचा ऑडिओ लागतो,ही तांत्रिक प्रगती जितकी चिंताजनक आहे तितकीच आश्चर्यजनक आहे. लोकांची फसवणूक करण्यासाठी त्याचा दुरुपयोग केला जात आहे. मुंबईत सध्या ‘व्हाईस क्लोनिग’ (Voice Clone) संबंधित अनेक गुन्हे दाखल होत आहे. जवळच्या नातलगाचे, मुलांचे आवाजाचे क्लोन करून सायबर स्कॅमर्स (Cyber Crime) कडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू आहे, अशाच प्रकारे फसवणूक झाल्याची नुकतीच एक तक्रार कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. मुलाचा हुबेहुब आवाज काढून सायबर स्क्रमरने ६८ वर्षीय पित्याकडून ८० हजार रुपये उकळले आहे. यापूर्वी या प्रकारच्या अनेक तक्रारी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत. (Cyber Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद कुमार कछारा (६८) हे त्यांच्या ६५ वर्षीय पत्नीसोबत चांदिवली, पवई येथे राहतात आणि त्यांचा मुलगा अमित कछारा (४३) हा दुबईत काम करतो. तक्रारदार यांचे कांजूरमार्ग येथे कार्यालय आहे.
तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, ते त्यांच्या कार्यालयात असताना त्यांना एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल आला.फोन करणाऱ्याने स्वत:ची ओळख आनंद कुमार अशी सांगितली, व त्याने स्वतःला यूएई ( UAE) मधील भारतीय दूतावासातील कर्मचारी असल्याचे सांगितले, आणि तक्रारदार यांचा मुलाला एका प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती दिली. (Cyber Crime)
 तक्रारदाराने  मुलाशी बोलण्याची विनंती केल्यावर, कॉलरने त्यांना मुलासोबत थोडक्यात संभाषण करण्याची सोय करून दिली. काही सेकंद बोलणे झाल्यावर तक्रारदार यांच्या मुलाचा हुबेहूब आवाजात पलीकडून मला सोडवा एवढेच बोलणे झाले,  ‘मुलगा’ संकटात सापडल्याने तक्रारदार घाबरले, त्यानंतर कॉलरने मुलाची सुटका करण्यासाठी ८० हजार रुपयांची मागणी केली, अन्यथा तो आयुष्यभर तुरुंगात राहील असे सांगून जी-पे स्कॅनर पाठवून ऑनलाईन लगेच पैसे पाठवा असे सांगण्यात आले.तक्रारदार यांनी त्यांच्या एका कर्मचाऱ्याच्या जी-पे वरून दोन भागात ८०हजार पाठवलेपैशाचा व्यवहार सुरू असताना कॉलरने फोन सुरूच ठेवला होता,पैसे मिळताच फोन बंद झाला. (Cyber Crime)
तक्रारदाराने आपल्या मुलाला त्याच्या मोबाईल क्रमांकावर कॉल करण्याचा प्रयत्न केला, दुपारी दीडच्या सुमारास त्याचा फोन लागल्यावर मुलगा दुबईत घरीच असल्याचे कळले, आपली  फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले आणि त्यांनी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.मुंबईत व्हाईस क्लोनिंग संदर्भात महिन्याभरात अनेक गुन्हे दाखल झाले आहे, सायबर स्क्रमरकडून वेगवेगळ्या वेगवेगळी कारणे देऊन व्हाईस क्लोनिंग माध्यमातून फसवणूक करीत आहे. (Cyber Crime)
Covers.ai, Voicify.ai आणि VoiceFlip.ai सारख्या वेबसाइट्सवर इन्स्टाग्राम रील्ससाठी गाण्यांची नक्कल करण्यासाठी व्हॉइस डीपफेकिंग एक मनोरंजन म्हणून सुरू झाली परंतु ElevenLabs, Speechify, Respeecher, Narakeet, Murf सारख्या अस्सल AI स्टार्टअप्सच्या मोठ्या समस्येत वाढ झाली आहे.  .ai, Lovo.ai आणि Play.ht हे स्क्रमरच्या हातातील शस्त्रे आहेत. (Cyber Crime)
इंटरनेटवर एक डझनहून अधिक वेबसाइट्स (Websites) आहेत, २९ भाषांमध्ये आणि ५० पेक्षा जास्त उच्चारांमध्ये ९५% अचूकतेसह विनामूल्य व्हॉइस क्लोनिंग पर्याय ऑफर करतात.  व्यावसायिक व्हॉईस क्लोनिंग मॉडेल देखील आहेत जे प्रत्येक स्वर, लय आणि सूक्ष्मता प्रतिबिंबित करू शकतात, सर्वसाधारणपणे डीपफेक खूपच धोकादायक असतात आणि विशेषतः व्हॉईस एआय लवकरच एका संघटित फिशिंग टूलमध्ये विकसित होईल अशी माहिती सायबर विभागाच्या एका सायबर तज्ञ अधिकारी यांनी दिली. (Cyber Crime)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.