गुढीपाढव्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला. यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच सोशल मीडियावर (Social Media) राज ठाकरे यांच्यावरही काही प्रमाणात टीका होत आहे. तर काही प्रमाणात राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांच्या निर्णयाचं स्वागत सुद्धा केलं जात आहे. मनसेचे कट्टर समर्थक आणि नेते एका वाहिनीला मुलाखत देताना राज ठाकरे हे आधुनिक राजकारणाचे कर्ण आहेत, भूमिका बदलणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे, असे प्रकाश महाजन (mns Prakash Mahajan) म्हणाले. (Raj Thackeray)
(हेही वाचा – Maharashtra State Kho Kho Championship : राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंना इलेक्ट्रिक बाईक )
एका वाहिनीला मुलाखत देताना महाजन म्हणाले की, राज ठाकरे यांनी ही भूमिका खूप विचारपूरवक घेतली आहे. तर काही कार्यकत्यांना ही भूमिका समजून घ्यायला वेळ लागेल. राज ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर केल्यामुळे विरोधकांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यात ही काही राजकीय मंडळी राज ठाकरे यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. कार्यकर्ता तसे संभ्रमात नाही, राज ठाकरेंनी घेतली भूमिका हिंदुत्वाच्या (MNS Hindutwa) प्रश्नावर आहे हिंदुत्वाच्या प्रश्नावर नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे मनसेचे हिंदुत्व हे शरीरावर चिटकलेल्या त्वचेसारखा आहे. असे महाजन म्हणाले. (Raj Thackeray)
(हेही वाचा – Social Media: सोशल मीडियाच्या वापरात मध्य रेल्वेने पटकावले अव्वल स्थान !)
लोकसभेमध्ये (Lok sabha eleaction 2024) एकही जागा मिळाली नसली तरी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या कडे पाहून महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. वाटाघाटी करणं हा राज ठाकरे म्हणाले तसं त्यांचा स्वभाव नाही. आता विधानसभेला नेमकी काय भूमिका घ्यायची हे राज ठाकरे आणि काही नेते सांगतील. विधानसभेला आम्ही ताकदीने उतरणार आहोत. महायुतीमध्ये सन्मान दिला ठीक आहे, नाही दिला तरी ठीक आहे. आमचा रस्ता सरळ आहे. असे विधान प्रकाश महाजन यांनी केले. (Raj Thackeray)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community