Lok Sabha Elections 2024 : यूपीतून भाजपाला 73 नव्हे तर पूर्ण 80 जागा हव्यात!

187
Lok Sabha Elections 2024 : यूपीतून भाजपाला 73 नव्हे तर पूर्ण 80 जागा हव्यात!
Lok Sabha Elections 2024 : यूपीतून भाजपाला 73 नव्हे तर पूर्ण 80 जागा हव्यात!
मायक्रो-मॅनेजमेंटचे चाणक्य गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी उत्तरप्रदेशातील सर्व 80 जागांवर विजय मिळविण्यासाठी निवडणुकीच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिले आहे. 18 व्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे देशातील राजकीय पारा चढला आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या मैदानात कंबर कसून उतरले आहेत. (Lok Sabha Elections 2024)
लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Elections 2024) सात टप्प्यात होणार आहे. यातील पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणे आहे. या पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी निवडणूक होणे आहे. 1,625 उमेदवार रिंगणात असून १,४९१ पुरुष आणि १३४ महिला उमेदवार रिंगणात आहेत. तामिळनाडूमधील करूर जागेसाठी सर्वाधिक 54 उमेदवार रिंगणात आहेत. नागालँडमध्ये लोकसभेच्या एकमेव जागेसाठी फक्त तीन उमेदवार आहेत. पहिल्या टप्प्यात तामिळनाडूच्या सर्व 39 जागांवर मतदान होणार आहे. येथे 950 उमेदवार आहेत. यूपीच्या 8 जागांसाठी 80 उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Elections 2024)
महत्वाचे म्हणजे, पहिल्या टप्प्यात भाजपाचे (BJP) नितीन गडकरी, अर्जुन मेघवाल, किरेन रिजिजू, के अन्नामलाई, तमिलिसाई सुंदरराजन, सर्बानंद सोनोवाल, भूपेंद्र यादव यांचे राजकीय भविष्य मतपेटीत बंद होणार ओ. त्याचबरोबर विरोधी पक्षाकडून नकुल कमलनाथ, अगाथा संगमा, राहुल कासवान, प्रताप खचरियावास, गौरव गोगोई अशी नावे आहेत. (Lok Sabha Elections 2024)
भारतीय जनता पक्षासाठी (BJP) सर्वात महत्वाचे राज्य बनलेल्या यूपीतील आठ जागांसाठी पहिल्या टप्प्यात निवडणूक होणे आहे. यासाठी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. यूपीतील एका सभेला संबोधित करताना शहा यांनी यूपीवासीयांना भाजपला (BJP) भरभरून मतदान करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, भाजपाला आता यूपीतून 73 जागा किंवा 65 जागा नको आहेत. आम्हाला आता संपूर्ण 80 जागांवर विजय हवा आहे. (Lok Sabha Elections 2024)
शहा यांनी काँग्रेस (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्यावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ‘काँग्रेसचे खरगे जी म्हणतात की राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या लोकांचा काश्मीरशी काहीही संबंध नाही’. मात्र, यूपीचा एक—एक मुलगा काश्मीरसाठी बलिदान देण्यास तयार आहे. (Lok Sabha Elections 2024)
जाहीर सभेला संबोधित करताना शाह म्हणाले की 2014 आणि 2019 मध्ये पीएम मोदी (PM Narendra Modi) पंतप्रधान होण्याचे सर्वात मोठे कारण उत्तर प्रदेश होते. आता आम्हाला मोदी यांना तिसऱ्यांदाही पंतप्रधान करायचे आहे. यावेळी ना 73 चालतील ना 65 चालतील, हे वेळ 80 पैकी 80 जागा. (Lok Sabha Elections 2024)
शाह म्हणाले की, 2014 पूर्वी गाय तस्करी आणि हिंदूंचे स्थलांतर होत होते. तुम्ही सपाला हटवले. आता बघा, उत्तर प्रदेशातून गुंडे स्थलांतरित होत आहेत. कधी कधी राहुल बाबा आमची खिल्ली उडवायचे की ‘मंदिर वहीं बनायेंगे पर तारीख नही बतायेंगे’. 2019 मध्ये तुम्ही पुन्हा एकदा मोदीजींचे सरकार स्थापन केले. पाच वर्षांत न्यायालयाचा निर्णय झाला, भूमिपूजनही झाले आणि 22 जानेवारीला श्री रामललाचे प्राणप्रतिष्ठा झाली. (Lok Sabha Elections 2024)
काँग्रेसने (Congress) 70 वर्षे कलम 370 लहान मुलाप्रमाणे सांभाळले. देशाने मोदीजींना दुसऱ्यांदा पंतप्रधान केले आणि मोदीजींनी 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द केले. शाह म्हणाले, ‘मी 2013 मध्ये पश्चिम उत्तर प्रदेशात आलो. त्यावेळी येथे भीती, दंगल, गोवंश तस्करी आणि गुंडांचे राज्य होते. तुम्ही समाजवादी पक्षाला सत्तेतून बेदखल केले आणि भय, गुंड आणि गाय तस्करीच्या ऐवजी वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्टचे काम सुरू झाले. (Lok Sabha Elections 2024)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.