गॅरी किमोविच कास्पारोव्ह (Garry Kimovich Kasparov) हे एक रशियन बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे आणि १९८५-२००० या काळात माजी जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन राहिले आहेत. त्याचबरोबर ते राजकीय कार्यकर्ते आणि लेखक देखील आहेत. त्यांचे सर्वोच्च FIDE बुद्धिबळ रेटिंग २८५१ आहे. कास्पारोव्ह जागतिक क्रमवारीत क्रमांक १ वर होते. कास्पारोव्हने सर्वाधिक सलग १५ व्यावसायिक स्पर्धा जिंकल्या आहेत आणि ११ वेळा बुद्धिबळ ऑस्कर जिंकण्याचा विक्रमही केला आहे. (Chess Champion)
कास्पारोव्ह यांचा जन्म १३ एप्रिल १९६३ रोजी रशियामध्ये झाला. १९८५ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी तत्कालीन चॅम्पियन ऍनाटोली कार्पोव्ह (Champion Anatoly Karpov) यांचा पराभव करून ते सर्वात तरुण विश्वविजेता झाले. १९८६, १९८७ आणि १९९० मध्ये त्यांनी कार्पोव्हविरुद्ध तीन वेळा आपले विजेतेपद राखून ठेवले. कास्पारोव्ह यांनी १९९३ पर्यंत अधिकृत FIDE जागतिक विजेतेपद स्वतः जवळ ठेवले होते. (Chess Champion)
बुद्धिबळातून निवृत्त झाल्यापासून, कास्परोव्ह यांनी लेखन आणि राजकारणासाठी आपला वेळ दिला आहे. २००३ मध्ये त्यांची पुस्तक-मालिका ’माय ग्रेट प्रीडिसेसर्स’ प्रकाशित झाली. यामध्ये त्यांच्या आधीच्या विश्वविजेत्या बुद्धिबळपटूंचा इतिहास आणि खेळांचा तपशील आहे. पुढे त्यांनी युनायटेड सिव्हिल फ्रंट चळवळीची स्थापना केली आणि व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्या प्रशासन आणि धोरणांना विरोध करणाऱ्या ’द अदर रशिया’चे सदस्यत्व स्वीकारले. २००८ मध्ये ते रशियन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उमेदवार म्हणून उभे राहणार होते, पण त्यांच्या प्रचारात समस्या आल्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. (Chess Champion)
२०११ मध्ये रशियन जन-निदर्शने सुरु झाली. २०१३ रोजी त्यांनी रशिया सोडले. “मी छळाच्या भीतीने रशिया सोडत आहे.” असे त्यांनी जाहीर केले. ते आपल्या कुटुंबासह न्यूयॉर्क शहरात राहत होते. २०१४ मध्ये, त्यांनी क्रोएशियन नागरिकत्व मिळवले. कास्परोव्ह हे ह्युमन राईट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत आणि आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष आहेत. २०१७ मध्ये त्यांनी अमेरिकेत रिन्यू डेमोक्रेसी इनिशिएटिव्ह या राजकीय पक्षाची स्थापना केली. (Chess Champion)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community