मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा कमी झालेला आकडा पुन्हा एकदा वाढला. मंगळवारी दिवसभरात जिथे ९५३ रुग्ण आढळून आले होते, तिथे बुधवारी १३५० रुग्ण आढळले. तर बुधवारी दिवसभरात ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अशी आहे बुधवारची आकडेवारी
बुधवारी दिवसभरात एकूण २२ हजार ७८८ जणांची कोविड चाचणी करण्यात आली. तसेच बुधावरी ४ हजार ५६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. संध्याकाळपर्यंत संपूर्ण मुंबईत २९ हजार ६४३ रुग्णांवर उपचार सुरू होते. मंगळवारी जिथे मृतांचा आकडा हा ४४ एवढा होता, तिथे बुधवारी तो ५७ वर पोहोचला आहे. या मृत्यू पावलेल्या रूग्णांमध्ये ३१ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे होते. यामध्ये ३१ पुरुष आणि २६ महिला रुग्णांचा समावेश आहे, तर चाळीशीच्या आतील ४ रुग्णांचा समावेश आहे. ६० वर्षांवरील ३८ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या १५ एवढी आहे.
#CoronavirusUpdates
१९ मे, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – १३५०
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ४५६५
बरे झालेले एकूण रुग्ण – ६४६१६३
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९३ %एकूण सक्रिय रुग्ण- २९६४३
दुप्पटीचा दर- २६९ दिवस
कोविड वाढीचा दर ( १२ मे ते १८ मे)- ०.२५ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 19, 2021
(हेही वाचाः म्युकरमायकोसिसचे दिवसाला २०० रुग्ण वाढतात! राजेश टोपे यांची माहिती )
मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९३ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा २६९ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत २७४ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून, झोपडपट्टी व चाळींची संख्या ही ७८ एवढी आहे.
Join Our WhatsApp Community