२०१४ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती ही केवळ आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांच्यामुळे तुटली. त्यांनी भाजपाशी कोणतीही चर्चा न करता स्वतःच मिशन १५० ची घोषणा केली. असा आरोप मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार (mlc Ashish Shelar) यांनी केला. २०१७ मध्ये आम्ही युतीत सडलो, असे विधान उबाटा गटाचे प्रमुख उद्धव टाकरे यांनी केला. तसेच दोन्ही निवडणुका शिवसेना एकट्याने लढली. तेव्हा मात्र शिवसेनेला विजय मिळवता आला नाही, असा टोलाही शेलार यांनी ठाकरे पिता-पुत्रांना लगावला. (Ashish Shelar)
(हेही वाचा – Sharad Pawar : २०१४ पासूनच भाजपासोबत जाण्यासाठी प्रयत्नरत होते; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट)
मुंबई महापालिकेतही शिवसेनेचा पराभव झाला. २०१४ मध्ये भाजपाचे १०० हून अधिक आमदार निवडून आले. महापालिकेतही ८४-८२ असे नगरसेवक आले. पण एकहाती सत्ता ठाकरेंना मिळाली नाही. असे विधान ही आशिष शेलार यांनी केले. ज्यावेळी उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासारखं नाही, तेव्हा ते भावनात्मक भाषणं करतात. एकनाथ शिंदेंना उचित स्थान दिले असते, तर शिवसेना (Shivsena) फुटली नसती. मुख्यमंत्रिपदाच्या मोहात उद्धव ठाकरे अडकले, त्यामुळे शिवसेना फुटली. आम्ही उद्धव ठाकरेंवर आंधळा विश्वास ठेवला. देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) पूर्ण विश्वास ठेवला, मित्राने धोका दिला. असा खोचक टोला ही शेलार यांनी लगावला. (Ashish Shelar)
(हेही वाचा – Mahila Bachat Gat Product : महिला बचत गटांची उत्पादने डबेवाल्यांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचणार)
ठाकरे पिता-पुत्रांना बोलायला जीएसटी (GST) लागत नाही. या पिता-पुत्रांची भाषणे महाराष्ट्र हिताची किंवा देशहिताची नाहीत. राज ठाकरेंनी (Raj thackeray) जी भूमिका घेतली ती युवकांसाठी, शैक्षणिक भविष्यासाठी घेतली आहे, तसे उद्धव ठाकरेंचे नाही. मिशन ४५ प्लस हे महायुतीचे ध्येय आहे. मोदी परिवार वाढवताना राज ठाकरेंसारखा चांगला सहकारी मित्र मिळत असेल, तर निश्चितच त्याचा आम्हाला आनंद आहे. असे विधान आशिष शेलार यांनी केले. (Ashish Shelar)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community