विरोधी पक्ष हिन मानसिकतेतून वर्धा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या सुनेचा राजकारणासाठी वापर करत असल्याचा आरोप भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उबाठा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Susama andhare) यांच्यावर केला. (Chitra Wagh)
(हेही वाचा- निवडणुकीनंतर केंद्रीय बल निघून जाईल, नंतर तुम्हाला TMC सोबत रहावे लागेल’; TMC च्या आमदाराची जनतेला धमकी)
सुषमा अंधारे (Susama andhare) यांनी तडस यांच्या सूनेसोबत काल नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी तडस यांच्या सुनेने त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले. यावर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एक्स समाज माध्यमावर व्हिडिओ पोस्ट करून सुषमा अंधारे यांच्यावर टीकेचे बाण सोडले. (Chitra Wagh)
चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, भाजपाचे (BJP) वर्धा मतदारसंघातील उमेदवार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या विरोधात काहीच सापडत नाही म्हणून विरोधकांनी आता वैयक्तिक वाद उकरून काढण्याचं काम सुरू केलं आहे. लोकसभा निवडणूक सुरू असतानाच रामदास तडस यांच्या विरोधात आरोप कसे काय केले जातात ? हा प्रश्न आहे. रामदास तडस यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी करणं यातूनच कौटुंबिक कलहाचा उपयोग राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केला जात आहे हे स्पष्ट होत आहे. (Chitra Wagh)
(हेही वाचा- Sharad Pawar : २०१४ पासूनच भाजपासोबत जाण्यासाठी प्रयत्नरत होते; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट)
उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) सटरफटरांनी घर मोडण्यापेक्षा घर उभं करण्यासाठी प्रयत्न करायला पाहीजेत. दुसऱ्याला नैतिकता शिकवण्याची उठाठेव करताना आपल्या स्वत:च्याच दिव्याखाली अंधार किती, याचा सटरफटरांनी विसर पडलेला दिसत आहे. (Chitra Wagh)
खरंतर रामदास तडस (Ramdas Tadas) यांचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही. पण कौटुंबिक वादाचा वापर राजकीय मुद्द्यासाठी केला जात आहे हे वाईट आहे. मुळात आत्ताच आरोप करण्याचा उद्देश काय आहे ? लोकसभा निवडणूकीत उमेदवार असल्यामुळे हे प्रकरण उकरून काढलं जातेय का ? असा संशय येत आहे. (Chitra Wagh)
(हेही वाचा- Mahila Bachat Gat Product : महिला बचत गटांची उत्पादने डबेवाल्यांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचणार)
शिवाय तडस (Sivaya tadasa) यांच्या सूनेने कधी साधी नगरपालिका लढविली नाही त्या अचानक लोकसभेसाठी अर्ज करतात यामागे कोण सूत्रधार आहे हे पण समोर यायला पाहीजे. हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे यावर जास्त बोलणे योग्य नाही. कोर्टात जे काही होईल ते मान्य करायला पाहीजे. राजकारणाचा स्तर उद्धव ठाकरेंचे चेलेचपाटे सटरफटरांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या हे मात्र नक्की, असे टीकास्त्र वाघ यांनी सोडले. (Chitra Wagh)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community