विशेष प्रतिनिधी,मुंबई
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्यासाठी २५ मे २०२४ हा अंतिम दिवस आहे. सर्व मालमत्ताधारकांनी या विहित मुदतीपूर्वी मालमत्ता करभरणा करून सहकार्य करावे. विहित मुदतीत करभरणा न केल्यास मालमत्ताधारकांवर कठोर दंडात्मक कार्यवाही केली जाईल, असे महानगरपालिकेच्या वतीने कळविण्यात येत आहे. (BMC Property Tax)
दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई
मालमत्ताधारकांनी विहित मुदतीत करभरणा करावा, यासाठी महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाच्या वतीने प्रसारमाध्यम, समाजमाध्यम आदींद्वारा वेळोवेळी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. मालमत्ताधारकाच्या सोयीसाठी सार्वजनिक सुटीच्या दिवशीही विभाग (वॉर्ड) कार्यालय तसेच नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. तसेच यासंबंधीत अडचणींचा निपटारा करण्यासाठी कर निर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु, अद्यापही करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी वेळीच कर जमा करुन दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात येत आहे. (BMC Property Tax)
(हेही वाचा – Sharad Pawar : २०१४ पासूनच भाजपासोबत जाण्यासाठी प्रयत्नरत होते; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट)
‘टॉप टेन’ मालमत्ताधारकांची यादी-
फ्लोरीट इन्व्हेसमेंट प्रा. लि (डी विभाग)- ०२ कोटी ६४ लाख ९० हजार ३९९ रुपये
दर्शन प्रॉपर्टीज (एम पश्चिम विभाग)- ०२ कोटी ५८ लाख ९७ हजार ९८८ रुपये
मोहम्मद कन्स्ट्रक्शन (के पश्चिम विभाग)- ०२ कोटी ५६ लाख ०७ हजार ९१६ रुपये
समीर भाऊनाथ जोशी (के पश्चिम विभाग)- ०२ कोटी ५५ लाख १९ हजार ७८० रुपये
हरदेवी पी. राजपाल (एच पश्चिम विभाग)- ०२ कोटी ५४ लाख ९४ हजार २३९ रुपये
मेसर्स लिओ रिअॅल्टर्स (पी दक्षिण विभाग)- ०२ कोटी ४८ लाख ६९ हजार २१७ रुपये
मानवेंद्र गृहनिर्माण संस्था मर्यादीत (एच पश्चिम विभाग)- ०२ कोटी ४२ लाख ५३ हजार ६८६ रुपये
सी. आर. टूर्स अँड ट्रॅव्हल्स (जी दक्षिण विभाग)- ०२ कोटी ४१ लाख १५ हजार ४९१ रुपये
समर्थ इरेक्टर्स अँड डेव्हलपर्स (पी उत्तर विभाग)- ०२ कोटी ३१ लाख ८६ हजार २४७ रुपये
लोखंडवाला कटारिया कन्स्ट्रक्शन (जी दक्षिण विभाग)- ०२ कोटी २९ लाख ११ हजार १५५ रुपये
हेही पहा –
Join Our WhatsApp Community