Heatstroke: उष्मघाताचे चटके कायम! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर

179
Heatstroke: उष्मघाताचे चटके कायम! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर
Heatstroke: उष्मघाताचे चटके कायम! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर

राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) सुरू आहे तर, दुसरीकडे उष्माघाताच्या (Heatstroke) प्रकारातही वाढ झाली आहे. राज्यभरात यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताच्या (Heatstroke) ७७ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक १२ रुग्णांची नोंद बुलढाण्यात झाली असून, पुण्यातही ५ रुग्ण आढळून आले आहेत. आगामी काळात रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा अंदाज आहे. (Heatstroke)

(हेही वाचा –Iran-Israel: इराण-इस्रायलमध्ये तणावग्रस्त परिस्थिती, भारताकडून नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी)

राज्यात १ मार्च ते १२ एप्रिल या कालावधीत उष्माघाताच्या (Heatstroke) ७७ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात गेल्या वर्षी १ मार्च ते १२ एप्रिल या कालावधीत उष्माघाताचे (Heatstroke) ३७३ रुग्ण आढळले होते. यंदा राज्यात सर्वाधिक १२ रुग्ण बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. त्यानंतर सिंधुदुर्ग ९, वर्धा ८, नाशिक ६, पुणे व कोल्हापूर प्रत्येकी ५, अमरावती, धुळे, सोलापूर, ठाणे प्रत्येकी ३, अहमदनगर, बीड, चंद्रपूर, जळगाव, परभणी, रायगड प्रत्येकी २ आणि अकोला, भंडारा, गोंदिया, नागपूर, नांदेड, धाराशिव, रत्नागिरी, सातारा प्रत्येकी एक अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघाताने (Heatstroke) एकही मृत्यू झालेला नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. (Heatstroke)

(हेही वाचा –Madhukar Chavan: उद्धव ठाकरे तुम्ही औरंगजेबासमोर झुकलात; मधुकर चव्हाण यांचा घणाघात)

मनुष्याचे शरीराचे सर्वसाधारण तापमान ३६.४ ते ३७.२ अंश सेल्सियस असते. बाहेर अथवा घरात तापमान अचानक वाढल्यास उष्णतेशी (Heatstroke) निगडित आजार होतात. त्यात शरीरावर लाल चट्टे उठणे, हात, पाय आणि टाचांना सूज येणे, स्नायू दुखणे, चक्कर येणे आणि उष्माघात असा त्रास होतो. उष्माघातामुळे हृदयविकारासह श्वसनविकार आणि मूत्रपिंडविकाराचा धोका निर्माण होतो. (Heatstroke)

हे पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.