सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. या काळात कोणत्याही प्रकारची महागाई होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. महागाई नियंत्रीत करण्यासाठी विविध प्रकारची धोरणं देखील आखत आहे. मात्र, काही वस्तूंची महागाई काही कमी होताना दिसत नाही. सध्या डाळींसह (Pulses) केळी (Banana), द्राक्षे (Grapes), पपईच्या (Papaya) दरात मोठी वाढ झाली आहे. (Loksabha Election 2024)
(हेही वाचा –Heatstroke: उष्मघाताचे चटके कायम! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर)
महिनाभरात डाळींच्या (Pulses) किंमतीत मोठी वाढ झाली आहे. डाळीच्या किंमतीबाबत बोलायचे झाले तर तुरीच्या डाळीच्या (Pulses) किंमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तुरीच्या डाळीनं १७० रुपयांचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तुरीच्या डाळीची (Pulses) खरेदी परवडत नसल्याचे दिसून येत आहे. मागील दोन ते तीन दिवसात डाळीच्या किंमतीत सात आठ रुपयांची वाढ झाली आहे. तर महिनाभराचा विचार केला तर डाळींच्या (Pulses) किंमतीत २० रुपयांची वाढ झाली आहे. तसेच हरभरा आणि मसूर डाळीच्या दरातही वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. (Loksabha Election 2024)
(हेही वाचा –Madhukar Chavan: उद्धव ठाकरे तुम्ही औरंगजेबासमोर झुकलात; मधुकर चव्हाण यांचा घणाघात)
डाळीबरोबरच (Pulses) द्राक्ष, सफरचंद, पपई आणि केळीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. द्राक्षाचा दर हा ८० रुपये प्रतिकिलोवरुन १२० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. तब्बल किलोमागे द्राक्ष ४० रुपयांनी महाग झाली आहे. तसेच पूर्वी पपई किंमतत ही ५० प्रतिकिलो होती, ती आता ९० रुपये किलोवर पोहोचली आहे. तर ५० रुपये डझनने मिळणारी केळी ही ७० ते ८० रुपयांवर गेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. (Loksabha Election 2024)
हे पहा –
Join Our WhatsApp Community